काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू, प्रणिती शिंदे म्हणतात,…

| Updated on: Aug 14, 2023 | 9:08 PM

महाराष्ट्रात काँग्रेस हाच स्थिर सरकार देऊ शकतो. बाकी सगळे पक्ष हे अस्थिर आहेत. बाकीचे पक्ष हे इकडून तिकडे जात आहेत, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू, प्रणिती शिंदे म्हणतात,...
Follow us on

पुणे : काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी पुणे जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. काँग्रेसने माजी मंत्री, कार्याध्यक्ष यांना लोकसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यासाठी जबाबदारी दिली. याचा आढावा काँग्रेसच्या वरिष्ठांना द्यायचा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या अनुषंगाने प्रणिती शिंदे आणि चारूताई टोकस या पुण्यात होत्या. मावळमधील तीन विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यात आला. कार्यकर्ते, नेते यांची मतं जाणून घेण्यात आली. अहवाल तयार करून प्रदेश काँग्रेस कमिटीला देण्यात येणार आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे.

सर्वेचा कल काँग्रेसच्या बाजूने आहे. महाराष्ट्रात काँग्रेस हाच स्थिर सरकार देऊ शकतो. बाकी सगळे पक्ष हे अस्थिर आहेत. बाकीचे पक्ष हे इकडून तिकडे जात आहेत, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

ईडीची भीती दाखवून आलेलं सरकार

भाजप हा पक्ष हार्स रायडिंग करत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील जनतेला काँग्रेस स्थिर सरकार देऊ शकेल. शिंदे-फडणवीस सरकार हे अस्थिर आहे. ते लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं नाही. ५० खोके तसेच ईडीची भीती दाखवून निवडून आलेलं सरकार आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

काँग्रेस देणार स्थिर सरकार

महाविकास आघाडी ही अजूनही आहे. लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल. भाजपच्या विरोधात स्थिरता देणे गरजेचे आहे. कसब्यामध्ये काँग्रेस निवडूण येणे हे भाजपच्या नेत्यांवर चपराक होती. त्यामुळे भाजप घाबरली आहे. सर्व सर्वेमध्ये भाजपच्या बाजूने कल दिसून येत नाही. सर्वेचा कल हा काँग्रेसच्या बाजूने आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

जनाधार असलेल्या व्यक्तीला तिकीट

आपल्याकडे लोकशाही असल्याने दावे सर्वच करणार. काँग्रेस हा सर्वांच ऐकून घेतो. काँग्रेस हा जनतेचं म्हणजे लोकांचं ऐकतो. जनाधार असलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं जाईल. तळागळात जाऊन पक्षाची बांधणी करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष त्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही प्रणिती शिंदे यांनी म्हंटलं.