गायकवाड-राज समर्थकांमध्ये ‘इतिहासा’वरून शाब्दिक राडा; गुद्द्याला गुद्द्याने उत्तर देण्याचा इशारा

राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. (Raj Thackeray)

गायकवाड-राज समर्थकांमध्ये 'इतिहासा'वरून शाब्दिक राडा; गुद्द्याला गुद्द्याने उत्तर देण्याचा इशारा
प्रवीण गायकवाड आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 4:52 PM

पुणे: राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. त्यामुळे राज समर्थकांनी गायकवाड यांना पुण्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे गायकवाड आणि राज समर्थक आमने सामने आले असून गुद्द्याला गुद्दयाने उत्तर देण्याची भाषा केली जाऊ लागली आहे. (pravin gaikwad supporter reply to MNS leader Vasant More criticism)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात प्रवीण दादा गायकवाडांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. गायकवाड समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. राज ठाकरे हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा खोटा इतिहास वाचवण्याचं काम करत आहेत. पुणे ही कोणाच्या बापाची जहाँगिरदारी नाही. आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार आहोत. मग ते राज ठाकरे असो किंवा कोणीही. इतिहासावरील चर्चेला चर्चेनं, गुद्द्याला गुद्द्यानं उत्तर देऊ, असा इशारा गायकवाड समर्थकांनी मनसेला दिला आहे.

श्रीमंत कोकाटेंची वादात उडी

या वादात श्रीमंत कोकाटे यांनीही उडी घेतली आहे. मनसेनं प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरु देणार नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. पुणे कुणाच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, तो शिवरायांचा शत्रू आहे, असा जोरदार हल्ला श्रीमंत कोकाटे यांनी चढवला आहे. राज ठाकरे यांच्यावर तरुण मुलं खूप प्रेम करत होती, म्हणून त्यांनी त्यावेळी 13 जागा जिंकता आल्या. पण आता काय परिस्थिती आहे याचं आत्मचिंतन मनसेनं करावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोरे काय म्हणाले होते?

प्रवीण गायकवाड यांनी केलेली टीका मनसेला चांगली झोंबल्याचं पाहायला मिळालं. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा दमच मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी गायकवाड यांना भरला आहे. वसंत मोरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा देतानाच 2019च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून तुम्ही इच्छुक होता. तेव्हा तुम्हाला मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना पाहिलंय. एवढेच काय मी प्रविण गायकवाड, असं स्वत:चं नाव लोकांना सांगत होतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे. (pravin gaikwad supporter reply to MNS leader Vasant More criticism)

संबंधित बातम्या:

पुणे कोण्याच्या बापाचे नाही, मनसेची धमकी श्रीमंत कोकाटेंनी उडवून लावली, पुन्हा वाद पेटणार?

लायकीत राहा, नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू; मनसेचा प्रवीण गायकवाडांना दम

बाबासाहेब पुरंदरेंवर इतिहासकारांचा ‘दंतकथे’चा आरोप, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच थेट उत्तर

(pravin gaikwad supporter reply to MNS leader Vasant More criticism)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.