इंदापूरमध्ये तिरंगी लढतीची चिन्हे; हर्षवर्धनभाऊ अन् दत्ता मामांवर टीका करत तरूण उमेदवार रिंगणात

Pravin Mane Sabha in Indapur Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील इंदापूरमधील राजकीय समीकरणं बदलत आहेत. अशात आता एक तरूण नेता निवणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. इंदापूरमध्ये नेमकं काय घडतंय? राजकीय स्थिती काय? वाचा सविस्तर...

इंदापूरमध्ये तिरंगी लढतीची चिन्हे; हर्षवर्धनभाऊ अन् दत्ता मामांवर टीका करत तरूण उमेदवार रिंगणात
दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 3:14 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. राज्याचे माजी मंत्री आणि इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे विरूद्ध माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत होणार आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्याने हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. या दोन नेत्यांमध्ये तगडी लढत होणार आहे. अशातच एक युवा चेहरा इंदापूरमधून लढण्यास इच्छुक आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

प्रविण माने निवडणुकीच्या रिंगणात?

सोनाई दूध संघाचे प्रविण माने हे इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या ऐवजी आपल्याला उमेदवारी द्या, अशी मागणी माने यांनी शरद पवारांकडे केली होती. मात्र ती मागणी मान्य न झाल्याने ते आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. आजच प्रविण माने यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिलेत.

प्रविण माने काय म्हणाले?

इंदापूरमध्ये भाषण करताना प्रवीण माने यांना अश्रू अनावर झाले. महाराष्ट्राप्रमाणेच इंदापूर तालुक्यात ही विधानसभेचा धडाका सुरू आहे. सकाळी उठलो ग्रामदैवत बाबीर देवस्थानचं नतमस्तक झालो. कुटुंबातील ज्येष्ठांचं दर्शन घेऊन धाकटे पंढरपूरचे दर्शन घेतलं आणि घरी आलो. जेव्हा घरी आलो तेव्हा गाडी घरी जात नव्हते त्यावेळी डोळ्यातून टचकन पाणी आलं. एवढी जर लोक प्रेम करत असतील तर…असं म्हणत असतानाच प्रवीण माने यांच्या डोळ्यात पाणी आलं.

इंदापूर तालुक्याचा 1995 सालचा इतिहास पाहा. इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे जेव्हा तिरंगी होते. जो अपक्ष उभा राहतो तेव्हा तो इंदापूर तालुक्यातून निवडून येतो हा इतिहास आहे. लोकांनी सांगितलं आहे. आता जर माघारी घेतली तर तुमचा नंबर डिलीट करून टाकू. आपल्या सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. परिवर्तनाच्या लढाईत समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे लक्षात ठेवा मी एकटा आमदार होणार नाही, असं प्रविण माने म्हणाले.

Non Stop LIVE Update
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी.
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम.
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ.
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी.
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?.
तिकीटासाठी पक्षाशी बंड अन् एकाच घरात दोन पक्ष, वडील एका पक्षात तर...
तिकीटासाठी पक्षाशी बंड अन् एकाच घरात दोन पक्ष, वडील एका पक्षात तर....
5 कोटी जप्त, शहाजी बापूंवर आरोप मात्र कारचं कनेक्शन नेमकं कोणाशी?
5 कोटी जप्त, शहाजी बापूंवर आरोप मात्र कारचं कनेक्शन नेमकं कोणाशी?.
'लाडकी बहीण' विरोधात अनिल वडपल्लीवारांची याचिका, कोर्टाचे निर्देश काय?
'लाडकी बहीण' विरोधात अनिल वडपल्लीवारांची याचिका, कोर्टाचे निर्देश काय?.
शिंदेंच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी या 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी
शिंदेंच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी या 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी.
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 45 जणांना उमेदवारी, कोणाला संधी
शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 45 जणांना उमेदवारी, कोणाला संधी.