Pune IMD : पुणे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची तूट 77 टक्के; हवामानशास्त्र विभागानं काय माहिती दिली? वाचा…
उपग्रह प्रतिमेनुसार, केरळच्या किनारपट्टीवर आणि अग्नेय अरबी समुद्राला लागून असलेल्या ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये येत्या 2-3 दिवसांत म्हणजे 30 मेपर्यंत मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात 77 टक्के पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (India Meteorological Department) म्हणण्यानुसार 1 मार्च ते 27 मे दरम्यानची ही स्थिती आहे. पुणे शहरासाठी मान्सूनपूर्व पावसाची कमतरता एकाच वेळी 37.7 मिलिमीटर एवढी आहे. IMDनुसार संपूर्ण महाराष्ट्रातही 62 टक्के कमतरता नोंदवली गेली आहे. IMD पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की पुणे शहरात ढगाळ (Cloudy) वातावरण कायम राहील. परंतु पावसाची शक्यता कमी आहे. अंदाजानुसार, मे अखेरपर्यंत पुणे शहरात ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. पण पावसाची शक्यता फारशी नाही. पुढील काही दिवसांत दिवसा आणि रात्रीचे तापमान (Temperature) अनुक्रमे 36 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असे कश्यपी म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात मान्सून कधी?
नैऋत्य मॉन्सून त्याच्या नियोजित तारखेपूर्वी अंदमानमध्ये पोहोचला असला, तरी त्यानंतर मान्सूनच्या सक्रियतेला विलंब झाला आहे. IMDचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले, की या मोसमात मान्सून सुरुवातीला तीव्र नसेल. सध्या, आम्ही महाराष्ट्रात मान्सून सुरू होण्याचा अंदाज लावलेला नाही. मात्र नैऋत्य मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून जमिनीवर पोहोचल्यानंतर तो महाराष्ट्राला कधी व्यापेल याचा अंदाज आम्ही बांधला आहे, असे महापात्रा म्हणाले.
दक्षिण अरबी समुद्रावरील खालच्या पातळीत पश्चिमेकडील वारे
मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज आयएमडीने यापूर्वीच वर्तवला होता. तर शुक्रवारी हवामान खात्याने नमूद केले, की नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, मालदीव आणि लक्षद्वीपच्या लगतच्या भागात आणि आणखी काही भागात पुढे सरकला आहे. नवीन हवामानशास्त्रीय संकेतांनुसार, पश्चिमेकडील वारे दक्षिण अरबी समुद्रावरील खालच्या पातळीत मजबूत झाले आहेत.
ढगाळ वातावरणात वाढ
उपग्रह प्रतिमेनुसार, केरळच्या किनारपट्टीवर आणि अग्नेय अरबी समुद्राला लागून असलेल्या ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये येत्या 2-3 दिवसांत म्हणजे 30 मेपर्यंत मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. याच काळात अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. आयएमडी अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची कमतरता नोंदवली गेली आहे.