पुणे : राज्य निवडणूक आयोगाला (State election commission) येत्या दोन आठवड्यांत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने (Pune municipal corporation)महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने अलीकडेच मतदानाशी संबंधित साहित्य खरेदीसाठी 70 लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की ते निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ, मतदान केंद्र आणि मतदार याद्या तयार करण्यावर काम करत आहेत. आम्हाला राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप तपशीलवार कार्यक्रम प्राप्त झालेला नाही, परंतु शेवटच्या क्षणी गडगड आणि गर्दी टाळण्यासाठी पुढील काही दिवसांत प्राथमिक काम सुरू होईल, मतदानाशी (Voting)संबंधित कामांसाठी कर्मचारी आणि मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तैनातीसाठी आम्ही लवकरच विविध सरकारी विभागांशी संपर्क साधू. असे सांगण्यात आले आहे.
पुढे त्यांनी सांगितले, की प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी आम्ही विविध समित्या स्थापन करू. नामनिर्देशन प्रक्रिया हाताळण्यासाठी प्रत्येक प्रभाग कार्यालयात कर्मचारी तैनात करावे लागतील. आणखी एका नागरी अधिकार्याने सांगितले, की महापालिकेच्या हद्दीत विलीन झालेल्या 23 पैकी सर्व गावांमध्ये प्रथमच नागरी निवडणुका होणार आहेत. या भागातील निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा परिषद यांच्याशी समन्वय साधत आहोत. सूचना आणि हरकती ऐकून दोन महिने झाले आहेत. मात्र, अंतिम मसुदा अद्याप जाहीर झालेला नाही. रहिवासी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वॉर्डांच्या सीमांमध्ये बदल सुचवले आहेत, असे नागरी संस्थेच्या सूत्राने सांगितले.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की जिल्हा निवडणूक कार्यालयाने महापालिकेसोबत मतदार याद्या सामायिक केल्या आहेत. प्रभागांच्या हद्दीनुसार मतदार याद्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया प्रभागांचा अंतिम नकाशा तयार झाल्यानंतरच सुरू होईल. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर एकूण 173 नगरसेवक निवडून येणार आहेत.