Palkhi : पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग; आळंदी, देहूत वारकऱ्यांची मांदियाळी, कशी सुरूय तयारी? वाचा…

देहू, आळंदी याठिकाणी संस्थानासोबतच वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. माऊलींची पालखी 21 जूनला आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये माऊलीच्या रथाची (Chariot) चाचणी घेण्यात आली.

Palkhi : पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग; आळंदी, देहूत वारकऱ्यांची मांदियाळी, कशी सुरूय तयारी? वाचा...
माऊलींच्या रथाची घेण्यात आली चाचणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 4:19 PM

पुणे : संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी (Palkhi) लवकरच प्रस्थान ठेवणार आहे. या दोन्ही पालख्यांच्या प्रस्थानाची लगबग आळंदी आणि देहूमध्ये सुरू झाली आहे. 20 आणि 21 जून रोजी पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. देहूवरून संत तुकाराम महाराजाची पालखी 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल, तर 21 जूनरोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान ठेवणार आहे. वारी 9 जुलैला पंढरपुरात पोहोचणार असून, आषाढी एकादशी 10 जुलैला आहे. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त आता आळंदी, देहूत वारकऱ्यांची मांदियाळी होण्यास सुरुवात झाली आहे. देहू, आळंदी याठिकाणी संस्थानासोबतच वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. माऊलींची पालखी 21 जूनला आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये माऊलीच्या रथाची (Chariot) चाचणी घेण्यात आली.

माऊली आणि सोन्या

माऊलींच्या रथाला बैल जोडीचा मान मिळालेल्या माऊली आणि सोन्या ही बैलजोडी जुंपण्यात आली होती. फुरसुंगीच्या अप्पासाहेब खुटवड यांच्या कुटुंबाला यंदाच्या पालखीचा मान मिळाला आहे. त्यांची सोन्या आणि माऊली ही बैलजोडी पालखी घेऊन पंढरीत दाखल होणार आहे. पाच वर्षानंतर मान मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. मागील दोन वर्षांपासून बसने निघणारी वारी यंदा पारंपरिक पद्धतीने पायी वाजत गाजत, टाळ मृदुंगाच्या गजरात निघणार आहे. वारीचा हा सोहळा वारकऱ्यांसाठी अत्यंत प्रिय आणि आनंददायी असा असतो. या वरीत वारकरी गुण्यागोविंदाने पायी पंढरपूर गाठतात. एकादिशीदिवशी विठुरायाच्या पायावर डोके टेकायला मिळावे यासाठी वारकरी तहानभूक विसरतात.

ताण वाहणारी जोडी

वारी, पालखासाठी असणाऱ्या बैलजोडीला पुणे ते पंढरपूर असा मोठा टप्पा गाठावा लागतो. त्यामुळे बैलांवरही सहाजिकच ताण येतो. हा ताण सहज वाहू शकणारी बैलजोडी यासाठी निवडली जाते. त्यासाठी बैलाचा सरावही आधी घेतला जोता. बैलांच्या खुराकाचीही विशेष काळजी घ्यावी लागते. बैल आजारी पडून नये किंवा थकू नये याचीही काळजी घ्यावी लागते. आता यंदा ही जबाबदारी सोन्या आणि माऊलीवर सोपवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सोन्या-माऊलीची जोडी

वारकऱ्यांची मांदियाळी

देहूमध्येही तुकाराम महाराजांच्या पालखीची लगबग आहे. रथाला चकाकी देण्याचे काम मागील आठवड्यातच पूर्ण झाले. तब्बल दोन वर्षानंतर पालखी रथ पंढरपूरकडे जाणार असल्याने चकाकी देण्याच्या कामाची लगबग पाहायला मिळाली. विशेष म्हणजे रथाची चकाकी देण्याचे काम मुस्लीम कारागीर मोठ्या श्रद्धेने करताना पाहायला मिळतात. शिळा मंदिराचे लोकार्पण झाल्याने आता वारकऱ्यांना आस लागली आहे, ती विठूरायाच्या दर्शनाची. त्यानिमित्त वारकऱ्यांची मांदियाळी देहूत पाहायला मिळत आहे.

21 किलो चांदीचे साहित्य भेट

देहूतील सोहळ्यानिमित्त काही राजकीय नेते, पदाधिकारीदेखील याकामी गुंतले आहेत. राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून जगद्गुरू संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी 21 किलो चांदीचे साहित्य भेट म्हणून देण्यात येणार आहे. चांदीच सिंहासन, अभिषेख पात्र, मखर, पूजा साहित्य पालखी सोहळ्याला भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्याची किंमत तब्बल 21 ते 22 लाख असल्याची माहिती त्यांनी दिली. शनिवारी पूजेच्या साहित्याची भव्य दिंडी काढण्यात येणार आहे, असे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.