पुन्हा गावाच्या वेशी बंद होणार का?, पुण्यात 12 गावं कोरोनाची हॉटस्पॉट, चिंता वाढली

पुणे जिल्ह्यातील 12 गावं कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. (pune declared corona hotspot)

पुन्हा गावाच्या वेशी बंद होणार का?, पुण्यात 12 गावं कोरोनाची हॉटस्पॉट, चिंता वाढली
कोरोना संसर्ग वाढतोय
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 3:25 PM

पुणे : पुण्यात कोरोना  (Pune corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येथील प्रशासन कोरोनाला थोपवण्याचा प्रयत्न करत असले तरी, म्हणावे तेवढे यश मिळत नाहीये. तालुका पातळीवर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून कोरोनाची धग गावकुसापर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील 12 गावं कोरोना हॉटस्पॉट (Corona Hotspot) म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तसेच येथील नागरिकांना जिल्हा आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (pune 12 villages declared corona hotspot)

प्रशासन अलर्ट, ग्रामपंचायतींना कारवाई करण्याचे आदेश

पुणे जिल्ह्यात गावांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील प्रशासन अलर्ट झालं आहे. मुळशी आणि जून्नर तालुक्यातील काही गावं मायक्रो हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर शिरूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट  म्हणून जाहीर करण्यात आला असून नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पुणे प्रशासनाने केले आहे. काही दिवसांपूर्वी हवेली तालुक्यात कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. मात्र, आता येथे पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर ग्रामपंचायत आणि पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यास सुरुवात

दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामळे प्रशानाने आपली तयारी सरु केली आहे. बंद करण्यात आलेले कोव्हिड सेंटर पुन्हा एकदा सुरु केली जाण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात खासगी रुग्णालयाच्या खाटा ताब्यात घेण्यास पालिका सुरुवात करणार आहे. पुणे माहनगरपालिका आयुक्तांनी रुग्णालयांना तसे पत्र पाठवली आहेत. आजघडीला पुणे पालिका प्रशासनाकडे फक्त 570 खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोना रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेता उपचारासाठी खाटा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या :

कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल होणार, हॉटेल, लग्न समारंभांवर करडी नजर; ठाणे पालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये!

… तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा

एकाच व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे चान्सेस आहेत का?; वाचा स्पेशल रिपोर्ट

(pune 12 villages declared corona hotspot)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.