Pune Abhijit Panse : करारा जवाब मिलेगा; राज ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना अभिजित पानसे यांचं चोख प्रत्त्युत्तर

पक्षातील नेत्यांवर नाराज असलेले वसंत मोरे हेदेखील राज ठाकरेंच्या सभेला पोहोचले. तत्पूर्वी त्यांनी बाइक रॅली काढली. या बाइक रॅलीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर महिलांची संख्याही यात जास्त होती.

Pune Abhijit Panse : करारा जवाब मिलेगा; राज ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना अभिजित पानसे यांचं चोख प्रत्त्युत्तर
मनसे नेते अभिजित पानसेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 11:09 AM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका करणाऱ्यांना करारा जवाब मिलेगा, असा घणाघात मनसे नेते अभिजित पानसे (Abhijit Panse) यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गणेश कला क्रीडा मंच याठिकाणी होत आहे. मनसेतील नेते सभास्थळी दाखल होत आहे. यावेळी पानसे यांनी विरोधकांवर टीका केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोलण्याची माझी पात्रता नाही. ते राज ठाकरे बोलतील. डॉन काय बोलणार हे डॉनच ठरवतो. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांसह आमचेही लक्ष आहे, असे पानसे म्हणाले. दरम्यान, स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरेंची सभा होत आहे. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वसंत मोरेंची बाइक रॅली

पक्षातील नेत्यांवर नाराज असलेले वसंत मोरे हेदेखील राज ठाकरेंच्या सभेला पोहोचले. तत्पूर्वी त्यांनी बाइक रॅली काढली. या बाइक रॅलीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर महिलांची संख्याही यात जास्त होती. पक्षात मागील महिनाभरापासून हुकूमशाही सुरू असून राज ठाकरेंच्या हे कानी घालणार असल्याचे ते म्हणाले आहेत. पक्षात झारीतील शुक्राचार्य असून त्यांना पक्षापेक्षा स्वत:ला मोठे व्हायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. तर तुम्हाला जेवढी उत्सुकता तेवढीच आम्हालाही असल्याचे त्यांनी सभास्थळी दाखल झाल्यावर प्रतिक्रिया दिली.

हे सुद्धा वाचा

‘आमच्या सभा अनेकवेळा सकाळी’

अनेकवेळा सकाळी सभा झालेल्या आहे. शिवतीर्थावरही अनेक बैठका सकाळी होत असतात, हे अनेकांनी पाहिले आहे. त्यामुळे कोण आरोप करते याला काहीच अर्थ नाही, असे ते म्हणाले. राज ठाकरे साहेब आहेत, ते काय बोलणार हे कोणालाच माहीत नसते, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्यावर जे आरोप करण्यात आले, त्या सर्वांना राज ठाकरे प्रत्त्युत्तर देतील. सत्ताधाऱ्यांना एखादी भूमिका पटली नाही तर ते टीका करतात. मात्र राज ठाकरे भूमिका बदलत नाहीत, असे अविनाश अभ्यंकर म्हणाले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.