पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका करणाऱ्यांना करारा जवाब मिलेगा, असा घणाघात मनसे नेते अभिजित पानसे (Abhijit Panse) यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गणेश कला क्रीडा मंच याठिकाणी होत आहे. मनसेतील नेते सभास्थळी दाखल होत आहे. यावेळी पानसे यांनी विरोधकांवर टीका केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोलण्याची माझी पात्रता नाही. ते राज ठाकरे बोलतील. डॉन काय बोलणार हे डॉनच ठरवतो. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांसह आमचेही लक्ष आहे, असे पानसे म्हणाले. दरम्यान, स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरेंची सभा होत आहे. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पक्षातील नेत्यांवर नाराज असलेले वसंत मोरे हेदेखील राज ठाकरेंच्या सभेला पोहोचले. तत्पूर्वी त्यांनी बाइक रॅली काढली. या बाइक रॅलीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर महिलांची संख्याही यात जास्त होती. पक्षात मागील महिनाभरापासून हुकूमशाही सुरू असून राज ठाकरेंच्या हे कानी घालणार असल्याचे ते म्हणाले आहेत. पक्षात झारीतील शुक्राचार्य असून त्यांना पक्षापेक्षा स्वत:ला मोठे व्हायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. तर तुम्हाला जेवढी उत्सुकता तेवढीच आम्हालाही असल्याचे त्यांनी सभास्थळी दाखल झाल्यावर प्रतिक्रिया दिली.
अनेकवेळा सकाळी सभा झालेल्या आहे. शिवतीर्थावरही अनेक बैठका सकाळी होत असतात, हे अनेकांनी पाहिले आहे. त्यामुळे कोण आरोप करते याला काहीच अर्थ नाही, असे ते म्हणाले. राज ठाकरे साहेब आहेत, ते काय बोलणार हे कोणालाच माहीत नसते, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्यावर जे आरोप करण्यात आले, त्या सर्वांना राज ठाकरे प्रत्त्युत्तर देतील. सत्ताधाऱ्यांना एखादी भूमिका पटली नाही तर ते टीका करतात. मात्र राज ठाकरे भूमिका बदलत नाहीत, असे अविनाश अभ्यंकर म्हणाले आहेत.