मी पाहिलं तेव्हा मुलगी हवेत होती… गाडी कोण चालवत होतं? पुणे अपघातामधील प्रत्यक्षदर्षीचा सर्वात मोठा खुलासा

Pune Accident Case Update : पुणे अपघात प्रकरणामधील सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपी गाडी ठोकल्यावर पैशांची ऑफर करत होते? गाडी कोण चालवत होतं? याबाबत अपघात ठिकाणावरील प्रत्यक्षदर्शी रिक्षा चालकाने सर्व घटनाक्रम सांगितला आहे.

मी पाहिलं तेव्हा मुलगी हवेत होती... गाडी कोण चालवत होतं? पुणे अपघातामधील प्रत्यक्षदर्षीचा सर्वात मोठा खुलासा
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 6:48 PM

पुणे अपघात प्रकरण आता न्यायालयात गेलं असून पोलीसही तपास करत आहे. दिवसेंदिवस या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अपघातावेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याचा आरोपीच्य वडिलांचा डाव पोलिसांनी उघडा पाडला. आता या अपघात प्रकरणामधील प्रत्यक्षदर्शी रिक्षा चालक अमीन शेख याने सर्व घटनाक्रम सांगितला आहे. अपघात झाल्यावर आरोपी मारहाण करत असलेल्या जमावाला पैशांची ऑफर देत होते. धडक इतकी भीषण होती की तरूणी हवेत उडाली आणि तडफडून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर काय-काय घडलं याबाबत अमीन शेख यांनी टीव्ही9 मराठीसोबत बोलताना सर्व घटनाक्रम सांगितला.

मी माझ्या गाडीजवळ थांबलो होतो, रस्ता क्रॉस करत होतो त्यावेळी आमच्या मागून एक गाडी गेली. पोर्षे कारचा आवाज आला आणि डाविकडे पाहिल्यावर तरूणी हवेत उडालेली दिसली. मी पळत गेलो पाहिलं तर तरूणीची हालचाल बंद झाली होती. एका मुलीने कपडा दिला तो त्या तरूणीच्या अंगावर टाकला. त्यानंतर जमलेल्या जमावाने गाडीतून दोन जणांना बाहेर काढलं आणि त्यांना मारहाण करायला सुरूवात केल्याचं अमीन शेख म्हणाले.

मारहाण होत असताना दोघेही जे काही नुकसान झालं आहे ते भरून द्यायला आम्ही तयार आहोत फक्त आम्हाला मारू नका असं बोलत होते. गाडीत तिघेजण होते त्यातील एकजण आधीच पळून गेला होता. आम्ही त्यांना पाहिलं तेव्हा त्यांनी ड्रिंक केलेली हे दिसत होतं कारण त्यांना उभं राहता येत नव्हतं. मारहाण होतअसताना ते फक्त इतकंच बोलत होते की आम्हाला मारू नका जे काही पैसे आहेत ते आम्ही द्यायला तयार आहोत, असं अमीन शेख यांनी सांगितलं.

मला पोलिसांनी दोनदा बोलवलं, एकदा सीपींच्या ऑफिसला आणि शास्त्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये, मला आतापर्यंत अपघातविषयी कुठे बोलू नका असा कोणताही दबाव टाकण्यात आलेला नसल्याचंही अमीन शेख म्हणाले. पोलिसांनी अपघातावेळी सोबत असलेल्या मित्राला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.