पुणे : पुण्यातून (Pune District) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात तिघांचा शौचालयाच्या टाकीत (Toilet Tank) बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्व जण शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी गेले होते. पुण्यातील कदमाकवस्ती इथं ही धक्कादायक घटना घडली. ग्रामपंचायत कर्मचारी शौचालयाचा टँक साफ करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. सिकंदर पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा दत्ता जाधव अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानं पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. यानंतर टाकीमध्ये पडलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. अखेरीस चौघांचा या घटनेत मृत्यू (Three people killed) झाल्याचं समोर आलं आहे. हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली आहे. प्यासा हॉटेलच्या मागच्या बाजूला ही घटना घडली आहे.
प्यासा हॉटेल हे राजेंद्र जयसिंग काळभोर यांचं असून त्यांच्या हॉटेलच्या मागच्या बाजूला एक इमारत आहेत. जय मल्हार कृपा असं या इमारतीचं नाव आहे. या बिल्डिंगच्या शौचालयाची टाकी उपसण्याचं काम सुरु असतेवेळी ही दुर्घटना घडली आहे.
इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करत असताना एक व्यक्ती तोल जाऊन पडले. पाईप टाकताना या व्यक्तीचा तोल गेला आणि ती व्यक्ती टाकी पडली. दरम्यान, या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेले तिघेही यात मृत्युमुखी पडलेत.
याबाबतची माहिती मिळताच टाकीमध्ये पडलेल्यांना वाचवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न सुरु केले. मात्र या दुर्दैवी घटनेत चौघांचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जाते आहे. सुरुवातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आणखी एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. एकूण चार जणांचा मृत्यू शौचालयाच्या टाकीत बुडून झाल्यामुळे सगळेच हादरलेत.
पुण्यात विद्यार्थ्याला मारहाण, 50 हजारांची लूट, बेसबॉल बॅटने कार फोडली
Video: आप कहाँ से, सर महाराष्ट्र, अच्छा, माझे वंशजही, यूक्रेनमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठी बाणा
भाजपचं ‘नवाब हटाओ, देश बचाओ’; चोराच्या उलट्या बोंबा, प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल