पुणे शहरातील १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना लास देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयातील एकूण ४० वेगवेगळ्या रुग्णालायातील लसीकरण केंद्रावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
Ad
सांकेतिक फोटो
Follow us on
पुणे – राज्यासह पुणे शहरात ओमायक्रॉनच्या विषाणूचा प्रसार वेगानेवाढताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरूवात झाली आहे. पुणे शहरातील १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना लास देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयातील एकूण ४० वेगवेगळ्या रुग्णालायातील लसीकरण केंद्रावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
वानवडी – रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय – कै .नामदेवराव शिवरकर दवाखाना, वानवडी, मीनाताई ठाकरे हॉस्पिटल, हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती राहे ख्वाजा गरीब नवाज दवाखाना,मिठानगर
कोंढवा – येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय – कै . कािशनाथ आनाजी धनकवडे प्रसृतीगृह, बालाजीनगर, सुखसागरनगर दवाखाना, राठी विहीरीमागे, माता रमाई आंबेडकर दवाखाना , साईनगर दवाखाना
कसबा -विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय – कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ ,कै .कलावती मावळे दवाखाना, नारायण पेठ, कै मातोश्री रमाबाई आंबेडकर दवाखाना , अंबील ओढा.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय – सद्गुरू शंकर महाराज दवाखाना ,बिबवेवाडी, स्व. प्रेमचंद ओसवाल दवाखाना ,अप्पर इंदिरा नगर, व्ही आय टी युगपुरुष शिवछत्रपती दवाखाना,बिबवेवाडी(अप्पर)
येरवडा – कळस – धानोरी – क्षेत्रीय कार्यालय- भारतरत्न स्व. .राजीव गांधी रुग्णालय येरवडा, कै गेनबा तुकाराम म्हस्के दवाखाना ,कळस
कोथरुड – बावधन- क्षेत्रीय कार्यालय – कै . सुंदराबाई गणपत राउत दवाखाना, केळेवाडी, कै जयाबाई नानासाहेब सुतार हॉस्पिटल , कोथरूड
नगररोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय – कै .दामोदर रावजी गलांडे पाटील दवाखाना, कल्याणीनगर, मीनाताई ठाकरे दवाखाना, वडगावशेरी
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय – ताडीवाला रोड दवाखाना, डॉ.नायडू सांसर्गिक रुग्णालय, बी.टी. कवडेरोड दवाखाना घोरपडी गाव
लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्याकडे आधारकार्ड / ओळखपत्र असणे आवश्यक असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे. किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांचे लसीकरण केले जाणारा आहे.