महायुतीमध्ये असलो तरी शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही- अजित पवार

Ajit Pawar Bhor Sabha Full Speech For Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार दौरा करत आहेत. आज ते पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहेत. इथे त्यांची सभा झाली. यावेळी अजित पवारांनी निवडणुकीसोबतच इतरही मुद्द्यांवर भाष्य केलं. वाचा सविस्तर...

महायुतीमध्ये असलो तरी शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही- अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 8:12 PM

अजित पवार यांची वैचारिक बैठक ही पुरोगामी विचारसरणीची. राजकीय व्यासपीठावर त्यांनी वारंवार बोलून दाखवली. पण वेगळी विचारसरणी असणाऱ्या भाजपसोबत त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार यांची विचारधारा काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. अजित पवार यांनी आजच्या भोरमधल्यासभेत यावर भाष्य केलं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ दिला. त्यांचं आपल्या जिल्ह्यात स्वागत करतो. महायुतीमध्ये असलो तरी शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधरा सोडलेली नाही, असं अजित पवार म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीची प्रचारसभा झाली. यात अजित पवार बोलत होते.

सुप्रिया सुळेंवर टीका

तुम्ही आत्तापर्यंत ज्यांना खासदार केलं त्यांनी भोर, वेल्हा, मुळशीसाठी आत्तापर्यंत कायं केलं? भोरची लोकसंख्या का कमी होतीय ह्याचा कधी विचार केलाय? इथं नसबंदी झालीय म्हणून लोकसंख्या कमी झालेली नाही. तर रोजगार नाही म्हणून कमी झाली आहे. पर्यटनाचा विकास झाला नाही. या ठिकाणच्या राजगड कारखान्यात उसाला हजार रुपये टनाला देऊन कसं होणार? यावेळेस महायुतीच्या अनेक पक्षांनी एकत्र येऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. या ठिकाणच्या खासदारानी कायं कामं केलीय सांगावं? नुसतं भाषण करून कायं होत? कायं अवस्था झालीय. सत्ता असताना विकास करायला कायं झालं होतं, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

एमआयडीच्या मुद्द्यावरून घणाघात

मी पुन्हा 5 तारखेला भोरमध्ये सभा घेणार घेणार आहे. मी शब्दाचा पक्का आहे. ही एक चांगली संधी आलेली आहे. भोरमधील उत्रौलीमध्ये 1992 साली एमआयडीसीचे शिक्के पडले आहेत.तरी एमआयडीसी झाली नाही. 30 वर्ष काय केलं? मागच्या वेळेस खासदार म्हणल्या एमआयडीसी नाही केली तर मतं मागायला येणार, असं म्हणाले होते. परत मागायला येतात, असं म्हणत अजित पवार यांनी एमआयडीसीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

…तर काहीही कमी करणार नाही- अजित पवार

महायुतीचा खासदार निवडून दिला तर पुढच्या 5 वर्षात भोरचा चेहरा मोहरा बदलेल. वाढप्या ओळखीचा असला तर आपल्या ताटात जास्त येतं. 15 वर्ष खासदाराला निवडून दिलं. त्यांनी काय केलं? याचं परीक्षण करा. विधानसभेची इलेक्शन नाही. त्यामुळं आमदारवर आत्ता बोलत नाही. पण तालुक्यातील संस्थाचं काय झालं याचा विचार करा. आम्हाला आपलं बहुमत असं मतं द्या. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री भोर, वेल्हा, मुळशीला काय कमी करणार नाही, असा शब्द अजित पवारांनी दिला.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.