Ajit Pawar Kolhapur By Election 2022 : मुख्यमंत्र्यांनी बारकाईनं लक्ष दिलं, कोल्हापूर उत्तरच्या निकालावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत (Kolhapur By Election) आमचा उमेदवार विजयी होईल. काँग्रेसचा (Congress)उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येईल. यात मुख्यमंत्र्यांनी बारकाईने लक्ष दिले, अशी पहिली प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

Ajit Pawar Kolhapur By Election 2022 : मुख्यमंत्र्यांनी बारकाईनं लक्ष दिलं, कोल्हापूर उत्तरच्या निकालावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 11:37 AM

पुणे : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत (Kolhapur By Election) आमचा उमेदवार विजयी होईल. काँग्रेसचा (Congress)उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येईल. यात मुख्यमंत्र्यांनी बारकाईने लक्ष दिले, अशी पहिली प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार, अशी खात्री होती. आघाडीने जो उमेदवार दिला, त्याला शिवसेनेनेही पाठिंबा दिला. मनापासून त्यांनी काम केले. शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक तिथे प्रचाराला गेले, असे ते म्हणाले. काँग्रेसतर्फे जयश्री जाधव या रिंगणात असून सध्या त्या आघाडीवर आहेत.  जयश्री जाधव विरुद्ध सत्यजीत कदम अशा होणाऱ्या या निवडणुकीत दोन नेत्यांची प्रतीष्ठ पणाला लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ही जागा भाजपाच्या गोटात यावी यासाठी पूर्ण जोर लावत आहेत. तर दुसरीकडून कोल्हापूर उत्तरचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी सतेज पाटील प्रयत्न करत आहेत. राजाराम तलावाशेजारील शासकीय गोदामात ही मतमोजणी पार पडत आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

कोण मारणार बाजी?

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवार, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. जवळपास 61.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्यासह 15 उमेदवार नशीब आजमावत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. 14 टेबलांवर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होतील. यानंतर उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चिठ्ठ्या काढून पाच ईव्हीएम निवडले जातील आणि त्या मशिनच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत.

‘अंतिम निकाल आल्यानंतर माझी प्रतिक्रिया देईल’

निवडून येण्याची खात्री वाटते. जवळपास नऊ हजारांपेक्षा अधिकचे लीड झाले आहे. राहिलेल्या फेऱ्यांमध्ये ते लीड वाढतच जाईल. अंतिम निकाल आल्यानंतर माझी प्रतिक्रिया देईल, असे अजित पवार म्हणाले.

आणखी वाचा :

Kolhapur North Election Result 2022 : करुणा शर्मांनीही अखेर कोल्हापूर उत्तरमध्ये खातं उघडलं, दुसऱ्या फेरीत बाराचा फेरा, एकूण किती मिळवणार?

Kolhapur Election Result 2022 : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा दबदबा सुरूच, जयश्री जाधव म्हणतात…

Kolhapur Election Result 2022 : काही तासात निकाल हाती, उत्तर कोल्हापुरात “पंजा कसणार की कमळ” फुलणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.