अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले, त्यांनी जी विकासकामं केली, त्याला मीच…
Ajit Pawar on Supriya Sule Baramati Loksabha Election 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. बारामतीतील विकासकामांवरून अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना खोचक टोला लगावला आहे. वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणूक सुरु आहे. सगळ्यांचं लक्ष आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. अजित पवार यांची सुप्रिया सुळे यांची नक्कल करत खोचक टोला लगावला आहे. केंद्र सरकारने साखर करखान्यावरील इनकम टॅक्स रद्द केला. बारामतीचा विकास चांगला झाला. म्हणून गुंतवणूक करण्यासाठी उद्योगपती बारामतीत येतात. कष्ट करणाऱ्याला पैसे मिळतात. बारामती विद्यमान खासदार यांच्या पत्रकांमध्ये जी विकास कामे दिली आहेत. त्याला निधी मीच दिला आहे, असं अजित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळेंना टोला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर्वांना मदत करतात. आपल्याला देखील गडकरी यांनी मदत केली. त्यांचे खूप खूप धन्यवाद…नमो रोजगार मेळाव्यासंदर्भात काहींनी टीका केली. फक्त 10 हजार नोकऱ्या दिल्या गेल्या म्हणून. परंतु आपण 1 हजार तरी नोकऱ्या दिल्या का?, असा अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.
सासवडला भव्य सभा होणार- अजित पवार
11 तारखेला सासवडला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थितीत सभा होणार आहे. जेजुरीच्या नाझरे धरणात सुद्धा पाणी आणणार आहे. हे माझ्या अनेक दिवसांपासून डोक्यात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा व्हायची. आता का फिरावं लागतंय? विकासाचा ओघ चालू ठेवायचा असेल तर आपला खासदार निवडून द्या. भावनिक होऊ नका… कुठलीही गोष्ट करायची ती चांगली करायची हा माझा स्वभाव आहे, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
मतदारांना काय आवाहन?
लोकं म्हणतील आमदारकी असताना खासदारकी कशाला? बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी खासदार हवा आहे. उमेदवारीचा अर्ज भरला आता एवढ केलंय. निवडून आल्यावर किती कामे करतो बघत राहाल. काही काही लोकांना फोन येत आहेत. मला फोन करण्याइतपत वेळ नाही. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभर फिरायचं आहे. आचारसंहिता असताना देखील निवेदनाचा गठ्ठा आलाय. लोकांना काम करतो म्हणून निवेदन देतात, असं अजित पवार म्हणाले.