Ajit Pawar | शरद पवार, गौतम अदाणी भेटीवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया…संसदेतील त्या फोटोवर…

| Updated on: Sep 24, 2023 | 11:37 AM

Pune Ajit Pawar News | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावर त्यांनी शरद पवार आणि गौतम अदाणी भेटीवर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar  | शरद पवार, गौतम अदाणी भेटीवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया...संसदेतील त्या फोटोवर...
Ajit Pawar
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

रणजित जाधव, पुणे | 24 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. यावेळी दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली जात नाही. शरद पवार अजित पवार यांच्या गटातील आमदारांच्या मतदार संघात जाऊन सभा घेत आहेत. त्यानंतर अजित पवार उत्तर सभा घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या द्वंदानंतर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा संसदेतील एकत्र फोटो समोर आला. त्या प्रकाराबद्दल शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना जाबही विचारला. आता अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

लालबागच्या राजातील गर्दीवर…

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या काही भगिनींनीना तिथे भोवळ आली, अशी बातमी कळाली. लालबाग राजाचा गणराया देश पातळीवर प्रसिद्ध झालाय. भाविकांची श्रद्धा आहे. त्यातच व्हीआयपी जातात. त्यामुळे दर्शनाला मोठी गर्दी होती. मंडळाने व्हीआयपीसाठी वेगळी आणि सामान्यांसाठी वेगळी रांग केली आहे. त्यानंतरही ही परिस्थिती उद्भवली. गणेश मंडळांची गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी मंडळाची आहे. त्याला सरकार म्हणून आमचे पोलीस सहकार्य करतात, असे अजित पवार यांनी सांगितले.

संसदेतील फोटोवर काय बोलले अजित पवार

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा संसदेतील फोटो व्हायरल झाला आहे. त्यांचा या फोटो बद्दल शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यावर अजित पवार यांना विचारले असते, ते म्हणाले की मला या विषयावर काही बोलायचं नाही. मला विकासाबद्दल विचारा. मी विकासासाठी बैठका घेतोय. माझं ध्येय फक्त विकास एक्के विकास एवढाच आहे, असे बोलत त्यावर थेट वक्तव्य करणे अजित पवार यांनी टाळले.

हे सुद्धा वाचा

आमदार अपात्र प्रकरण

शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यांनी अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला तक्रार करण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार आहे. कायद्याच्या नियमांच्या चौकटीत बसवून त्यावर निर्णय देतील.

शरद पवार, गौतम अदानी भेट

शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांची अहमदाबादमध्ये जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या भेटीसंदर्भात सर्वांना उत्सुक्ता आहे. त्यावर अजित पवार यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते पुन्हा म्हणाले की हा विकासाचा मुद्दा आहे का? मला याबाबत काही बोलायचं नाही. मला विकासासंदर्भात प्रश्न विचारा.