कोरोनाने गेलेल्या बहिणीच्या दशक्रियेनंतर भावाचेही निधन, पुण्यातील कुटुंबावर शोककळा

एका मागून एक हाता-तोंडाशी आलेली लेकरं कोरोनाने हिरावल्यामुळे हिंगे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Pune Ambegaon Brother Sister COVID )

कोरोनाने गेलेल्या बहिणीच्या दशक्रियेनंतर भावाचेही निधन, पुण्यातील कुटुंबावर शोककळा
माधवी आणि मयुर हिंगे पाटील
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 1:53 PM

पिंपरी चिंचवड : सख्ख्या बहीण-भावाचा कोरोना संसर्गामुळे पाठोपाठ मृत्यू झाल्याने पुण्यातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडील, भाऊ-बहीण यांना एकाच दिवशी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान बहिणीचे निधन झाले. तर तिच्या दशक्रिया विधीच्या दुसऱ्याच दिवशी भावाचीही प्राणज्योत मालवली. (Pune Ambegaon Brother Sister Dies of COVID within 11 Days)

उच्चशिक्षित भावंडांचा अकरा दिवसात मृत्यू

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक भागात राहणाऱ्या 31 वर्षीय माधवी बाळासाहेब हिंगे पाटील हिचे अकरा दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते. तर तिचा 29 वर्षीय भाऊ मयुर बाळासाहेब हिंगे पाटील याचा शनिवारी पुण्यात कोरोनानेच अंत झाला. एका मागून एक हाता-तोंडाशी आलेली लेकरं कोरोनाने हिरावल्यामुळे हिंगे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुटुंबातील चौघेही पॉझिटिव्ह

माधवी हिंगे पाटील हिचे डीएडपर्यंत शिक्षण झाले होते. तिने ज्योतिष शास्त्र, अंक शास्त्र विषयात पदवी घेतली होती. तर तिचा धाकटा भाऊ मयुर हा संगणक इंजिनिअर झाला होताय पंधरा दिवसांपूर्वी आई-वडील आणि भाऊ-बहीण एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

आई-वडिलांची कोरोनावर मात

आई-वडील कोरोनातून व्यवस्थित बरे झाले, मात्र माधवी आणि मयुर यांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच माधवीचे निधन झाले. माधवी हिचे दशक्रिया विधी शुक्रवारी करण्यात आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मयुरचेही निधन झाले.

शेतकरी वडील, अंगणवाडी केंद्र प्रमुख आई

एकामागून एक कोरोनाने पोटची मुलं हिरावल्यामुळे हिंगे पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तर ते राहत असलेल्या परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माधवी आणि मयुर यांचे वडील शेती करत असून आई पंचायत समिती आंबेगाव येथे अंगणवाडी केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहे.

रमेश वांजळेंच्या मेहुण्यांचाही पाठोपाठ मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिवंगत आमदार रमेश वांजळे (MLA Ramesh wanjale) यांच्या दोन सख्ख्या मेव्हण्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 52 वर्षीय सतीश कुंडलिक गवारे आणि 47 वर्षीय दत्तात्रय कुंडलिक गवारे यांनी प्राण गमावले. धक्कादायक म्हणजे अवघ्या बारा तासांच्या अंतरानं या दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या : 

नकळत कोरोना पॉझिटिव्ह नातेवाईकाची भेट जीवावर बेतली, सांगलीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पंढरपुरात निवडणुकीमुळे कोरोनाचा उद्रेक, ड्युरीवरील शिक्षकासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

(Pune Ambegaon Brother Sister Dies of COVID within 11 Days)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.