सुनिल थिगळे, पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचे (Leopard news) वास्तव्य नवीन नाही. मात्र लोकवस्तीतून बिबट मादी आणि नर असा दोघांचा मुक्तपणे वास्तव काही लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात सुद्धा कैद केले आहेत. यावेळी बिबट नर पुढील रस्त्यावर येऊन रस्त्यावर झोपल्याचे दिसून येत आहे. तर पाठीमागून आलेल्या मादीसोबत रमतगमत बिबट जाताना दिसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंचर शहरालगत (Manchar city) चांडोली रोडवर थोरात मळ्यात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्रात बिबट्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. कारण उसाच्या शेतीमुळे बिबट्या आपला ठिय्या शेतात मांडला आहे. गावाकडं घराच्या बाजूला ज्यांची शेती आहे. त्यांना नियमितपणे बिबट्याचं दर्शन होत आहे. आतापर्यंत बिबट्याने पाळीव प्राण्यांवरती खूपदा हल्ले केले आहेत. त्याचबरोबर वनविभागाने सुध्दा अनेक बिबटे जेरबंद करुन जंगलात सोडले आहेत.
रोज बिबट्याल्या हल्ल्याच्या बातम्या येत असल्यामुळे नागरिक सुध्दा चिंतेत आहेत. बिबट्याने अनेकदा लहान मुलांना टार्गेट केलं आहे. पुण्यातील आंबेगाव परिसरात बिबट्याची इतकी दहशत निर्माण झाली आहे, लोकांना घराबाहेर पडायला भिती वाटतं आहे.