अजिदादांच्या आवाजाचा दरारा कायम, तर त्यांना माझं आवाहन आहे की, त्यांनी…

Amol Kolhe on Ajit Pawar Challange about Shirur Loksabha Constituency : अजित पवारांचं आव्हान स्विकारणार का?; अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले? अजित पवार यांच्या आवाहनाला अमोल कोल्हे प्रतिआव्हान देणार का? शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले? वाचा..

अजिदादांच्या आवाजाचा दरारा कायम, तर त्यांना माझं आवाहन आहे की, त्यांनी...
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 12:27 PM

पुणे | 26 डिसेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीची पहिली झलक दाखवली. राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोनल कोल्हे यांना थेट चॅलेंज दिलं. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार अन् तो निवडून आणणार असं अजित पवार म्हणाले. यानंतर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा अमोल कोल्हे यांनी अजितदादांना आवाहन केलं आहे. अजितदादांना टोलाही लगावला आहे.

अमोल कोल्हे यांचं आवाहन काय?

अजितदादांचा एवढा दरारा आहे. त्यांनी केंद्र सरकारला बोलावं आणि कांदा निर्यात बंदी उठवावी. त्यांच्याकडे अर्थखातं आहे. तर त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा. तत्वांबरोबर राहणं योग्य आहे. त्या पक्षासोबत मी आहे. मी कुठे गेलो आहे? येणाऱ्या भविष्य काळात गणित दिसेल. आमदार कोण-कोणत्या कारणामुळे भूमिकेत आहेर हा एक चर्चेचा विषय आहे. माझा ना कारखाना आहे ना कंपन्या आहेत. ना माझ्यावर चौकशी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनता ठरवेल, कुणाला निवडून द्यायचं ते, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

अजितदादांना टोला

अजितदादांनी काल एका चित्रपटाचा उल्लेख केला.मात्र एका चित्रपटातील संवाद आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना दक्खनची सुभेदारी द्यावी, असं दिल्लीपतींच्या मनात होतं. दख्खनची सुभेदारी ही स्वराज्याच्या कैक पट होती. मात्र तेव्हा सुभेदारी स्वीकारली नाही. तत्वांशी तडजोड केली नाही. म्हणून तर आज ताठ मानेन जगतोय, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांनी टोला लगावला आहे.

शेतकरी प्रश्नावर अमोल कोल्हे आक्रमक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. सहा मुद्दे घेवून आपण यात्रा करत आहोत. कांदा बंदी उठवावी. दिवसा वीज द्यावी. विमा कंपन्याचं धोरण निश्चित करावं. दुधाचे दर पडले आहेत. 26 लाख लिटर दुधाचं कलेक्शन आहे.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,यासाठी आम्ही यात्रा काढत आहोत.या यात्रेसाठी शरद पवार यांचं मार्गदर्शन घेतलं आहे. पवारसाहेब देशाचे कृषीमंत्री होते तेव्हा कांद्यावर बंदी आणवी, अशी भाजपची भूमिका होती मात्र पवारांनी ठाम भूमिका घेतली आहे. आता शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने निर्णय घ्यावेत यासाठी आम्ही यात्रा काढतोय, असं अमोल कोल्हे म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.