अजितदादा आपसे बैर नहीं, लेकिन…; बारामतीच्या सभेतून अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा

Amol Kolhe on Baramati Loksabha Election 2024 : बारामतीतील सभेत बोलताना अमोल कोल्हे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर...

अजितदादा आपसे बैर नहीं, लेकिन...; बारामतीच्या सभेतून अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 5:34 PM

छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतल्या लोकांना जगायचं कसं हे शिकवल्यानंतर ह्याचं मातीतल्या माणसाला शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज… ज्यांची प्रचाराची नाही तर ज्यांची विजयाची सभा इथे पार पडत आहे. त्या सुप्रिया सुळे, असा उल्लेख करत अमोल कोल्हे यांनी बारामतीतील भाषणाला सुरुवात केली. या सभेचा विजयाची सभा असा उल्लेख कोल्हे यांनी केलं आहे. सभेची जागा काढू घेऊ शकाल पण बारामतीच्या काळजातली जागा कुणाला आहे? हे ही गर्दी दाखवून देत आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजितदादा आपसे बैर नहीं…- कोल्हे

7 तारखेला मतदान करायला जात असताना नरेंद्र मोदी यांनी 2014 ला कायं सांगितल होतं, हे लक्षात ठेऊन जा… घरातल्या गॅस सिलेंडरला 3 वेळा नमस्कार करून जा… शेतकऱ्यांना आठवून जा… बेरोजगार तरुणांचा चेहरा आठवून जा.. आणि 3 नंबरचं बटन दाबून 3 लाखांच्या मताधिक्यने निवडून द्या… घड्याळाला मतं म्हणजे भाजपला मतं हे जनतेला कळून चुकलंय, त्यांना मतं कसं द्यायचं? आज ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत. अजितदादा आपसे बैर नहीं…लेकिन BJP ‘तेरी खेर नहीं… असं म्हणत अमोल कोल्हे यांनी जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे.

अजित पवारांची मिमिक्री

मी स्वतःला भाग्यवान समजतो. सुप्रिया सुळे यांच्या सभेला येण्याचं भाग्य मला मिळालं. सुप्रिया सुळे संसदेत बोलायला लागल्यावर संपूर्ण महाराष्ट्रला अभिमान वाटतो. शरद पवार यांचा हात डोक्यावर हात असल्यावर कायं होऊ शकत. मला पाडण्याची भाषा करणारा अजून बारामतीमधून बाहेर पडू नाही शकला. सर्व सामान्य जनतेनी ही निवडणूक हाती घेतली आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.  परत जर तुम्हाला कुणाचा फोन आला. तर एकदा सांगितलं ना तुला… असं म्हणतं अमोल कोल्हे यांनी केली अजित पवार यांची मिमिक्री केली.

नरेंद्र मोदींनी पवार साहेबांचा भटकटी आत्मा असा उल्लेख केला. आज मी अभिमानाने सांगतो पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मा आहेत. हा महाराष्ट्रचा आत्म गेला 55 वर्ष हिंदुस्थानच्या आत्मसन्मानासाठी जगतोय.लहानपणीची गोष्ट सांगत, आजीनी सांगितले चोरीची गोष्ट कधी टिकत नसती, असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.