अमोल कोल्हे यांचा शिवाजीराव आढळराव पाटलांवर निशाणा; म्हणाले, यांचा छत्रपती संभाजीराजेंच्या इतिहासावर…

Amol Kolhe on Shivajirao Adhalrao Patil and Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अन् जागावाटप; अमोल कोल्हे काय म्हणाले? शिवाजीराव आढळराव पाटलांवर टीका करताना अमोक कोल्हे यांनी काय म्हटलं? निवडणूक प्रचारावर अमोल कोल्हे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

अमोल कोल्हे यांचा शिवाजीराव आढळराव पाटलांवर निशाणा; म्हणाले, यांचा छत्रपती संभाजीराजेंच्या इतिहासावर...
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 3:38 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे मतदारसंघाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या विकासा आराखडाच्या भूमिपूजन दिवशी महायुतीमधील जे कोणी नेते जे स्टेजवर मिरवत होते. त्यांना आज इथ येऊन नतमस्तक व्हावं वाटलं नाही. हे काळजात किती स्थान आहे. मायबाप जनता पाहते आहे. इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांच्या विकास आराखड्याच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर बोलत होते. त्यांना मात्र आज बलिदान दिवशी नतमस्तक व्हावसं वाटत नाही हे दुर्दैवी आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

अजित पवारांवर निशाणा

पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभेत आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार सुरू आहे. या ठिकाणी अमोल कोल्हे स्थानिकांशी चर्चा करत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. तर मग जिल्ह्याचे पालकमंत्री कुठं आहेत? जिल्ह्याचे पालकमंत्री विकासाच्या गोष्टी करत असतात. पण बैठका घेताना दिसत नाहीत. काही करताना दिसत नाही. चारा छावणी टँकर या मागणी माननीय पालकमंत्री नी त्याच्या कार्यशैलीनुसार तातडीने दुष्काळावर पावला उचलाव्याशी अपेक्षा आहे, असं म्हणत कोल्हेंनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय.

एकनाथ खडसेंच्या भूमिकेवर काय म्हणाले?

एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाथाभाऊ फार मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. त्यांनी भूमिका मांडली आहे. शरद पवारसाहेब यांच्याबद्दल ते बोलले आहेत. आता ही भूमिका का हे सगळ्यांना माहिती आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.

जागावाटपावर काय म्हणाले?

जागावाटपाच्या मुद्द्यावरही अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमधील खदखद समोर येत आहे. आताच ही अवस्था असेल तर विधानसभा लोकसभा उमेदवार जात्यात आहेत. तर विधानसभा ज्यांना लढवायची आहे ते सुपात आहेत. त्यामुळं ज्यांना महायुती कडून लढवायची आहे. त्याच्या काळजात आताच धकधक सुरू झाली आहे. हीच धाकधूक असंतोष रूपाने बाहेर पडेल, असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.