गृहमंत्र्यांच्याच सुरक्षेत सोडली कसूर; ताफ्यात अज्ञाताची घूसखोरी..?; पोलीसही चक्रावले…
गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यात घुसण्याचे नेमक कारण काय आणि त्याचा हेतू का होता याचा तपास पोलीस करत आहेत. आता चतु:श्रृंगी पोलिसांनी या तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुणे : अमित शाह यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचे वृत्त समोर आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी स्थानिक पोलिसांची नजर चुकवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या ताफ्यात प्रवेश केला होता. त्या व्यक्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या जवळची आपण व्यक्ती असल्याचे त्याने सांगितले. आयबी टीमने या व्यक्तीच्या हालचाली टिपल्यानंतर त्याला काही मिनिटामध्येच त्याला ताब्यात घेण्यात आले. पुणे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून सोमेश धुमाळ असे या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमित शाह वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ज्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो युवक युवक मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी संबंधित असल्याचे त्यांने आधी सांगितले होते.
मात्र त्याने स्थानिक पोलिसांना चकमा देऊन ताफ्यात घुसला होता, मात्र अंतर्गत वर्तुळात उपस्थित असलेल्या आयबी अधिकाऱ्यांना चो चकमा देऊ शकला नाही. त्याच्या हालचालींचा पोलिसांनी संशय आल्याने पळून जात असतानाच त्याला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले.
गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यात घुसण्याचे नेमक कारण काय आणि त्याचा हेतू का होता याचा तपास पोलीस करत आहेत. आता चतु:श्रृंगी पोलिसांनी या तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जेडब्ल्यू मेरेट हॉटेलमधून त्याला पकडण्यात आले असून त्याचे नाव सोमेश धुमाळ आहे. मात्र केंद्रीय मंत्र्याच्या काफिल्यात तो का घुसला?याचा शोध पोलीस घेत आहेत.
त्यामुळे पोलिसांनी आता तो कोणाच्या गाडीत बसला होता? काफिल्यात घुसून तो काय करू पाहत होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
तत्पूर्वी अमित शाह यांचे पुण्यात आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते.