काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; रविंद्र धंगेकरांच्या उमेदवारीला कडाडून विरोध

Pune Congress : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी समोर आली आहे. एकीकडे जास्तीत जास्त जागांवर दावा केला जात असतानाच स्वपक्षातीलच नेत्यांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय? नाराजी नेमकी काय आहे? वाचा सविस्तर...

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; रविंद्र धंगेकरांच्या उमेदवारीला कडाडून विरोध
राहुल गांधी, रविंद्र धंगेकरImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 12:44 PM

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. अशातच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारी देण्यावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचं समोर आलं आहे. कसब्याचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकरांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे. पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची पक्षाकडे मागणी केली आहे. अरविंद शिंदे यांनी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध केला आहे. त्यांनी स्पष्टपणे रविंद्र धंगेकरांचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख धंगेकरांकडे असल्याचं दिसतंय.

धगेंकरांच्या उमेदवारीला विरोध

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे विरोध केला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. जे उमेदवार पक्षाचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मलिकार्जून खर्गे यांचे फोटो बॅनर्सवर लावणार नाहीत अशांना उमेदवारी देऊ नका. व्यक्तिगत राजकारण करणाऱ्यांना पक्ष संधी देणार नाही. कोणी काँग्रेस विचाराशी एकरूप नसेल तर असा कोणी उमेदवार असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी पक्षाकडे केली आहे.

अरविंद शिंदेंचा रोख कुणाकडे?

तुमचा रोख कुणाकडे आहे? असा आम्ही त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा माझा रोख काँग्रेसमधील कोणी एका व्यक्तीकडे नाही. तर शहरात असं कोणी काँग्रेस नेता असेल कोणी पदाधिकारी हे काँग्रेस बैठक किंवा आंदोलनला 50 टक्के उपस्थितीत नसतील. त्यांना उमेदवारी देताना विचार करावा. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या आम्हाला मान्य असेल. 22 जणांनी विधानसभा निवडणुकीत आठ मतदारसंघात इच्छुक आहेत, असं शिंदे म्हणाले.

पुण्यात काल काँग्रेसची पक्ष विभागीय बैठक पार पडली. त्यात शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे अंतर्गत नाराजी आणि खतखद व्यक्त केली. पुणे शहरातील पाच जागा मागितल्या आहेत. शहरात आठ मतदारसंघ आहेत. पहिल्या तीन आणि आता हडपसर आणि पर्वती मतदारसंघ मागितला आहे. या दोन्ही ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत आणि मतदार आहे. मित्र पक्षाकडे सध्या उमेदवार नाहीत. आम्ही या जागा जिंकू शकतो. पूर्वी हडपसर आणि पर्वती हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे होते. तिथं आमचा उमेदवार निवडूव येऊ शकतो, असंही अरविंद शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.