अविनाश भोसलेंची 164 कोटी तर संजय छाब्रिया यांची 251 संपत्ती जप्त, येस बँक घोटाळा प्रकरणी कारवाई
येस बँक घोटाळा प्रकरणी कारवाई
पुणे : प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची 164 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर संजय छाब्रिया यांची 251 कोटीची मालमत्ता जप्त केली गेली आहे. दोघांची मिळून 415 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. येस बँक घोटाळ्यात आतापर्यंत 1827 कोटी मालमत्ता जप्त केली गेली आहे. अविनाश भोसले यांचा मुंबईतील ड्यप्लेक्स फ्लॅट जप्त केला गेला आहे. तर छाब्रिया यांची बंगळुरू आणि सांताक्रुझमधील जमीन, सांताक्रुझ तीन कोटींचा फ्लॅट जप्त करण्यात आलेत. दोन दिवसाआधी सीबीआयने अविनाश भोसले यांना सर्वात मोठा दणका देत त्यांचे हेलिकॉप्टरही जप्त केलं आहे. मनी लॉन्ड्री प्रकरणातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली.
ED has provisionally attached assets worth Rs. 251 Crore of Sanjay Chhabria and assets worth Rs 164 Crore of Avinash Bhosale, (total asset worth of Rs. 415 crore) in Yes Bank- DHFL Fraud case under PMLA, 2002. Total attachment in the case stands at Rs. 1827 Crore.
हे सुद्धा वाचा— ED (@dir_ed) August 3, 2022
415 कोटींची मालमत्ता जप्त
अविनाश भोसले यांची 164 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर संजय छाब्रिया यांची 251 कोटीची मालमत्ता जप्त केली गेली आहे. दोघांची मिळून 415 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून आर्थिक अफरातफर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. येस बँक घोटाळ्यात आतापर्यंत 1827 कोटी मालमत्ता जप्त केली गेली आहे. अविनाश भोसले यांचा मुंबईतील ड्यप्लेक्स फ्लॅट जप्त केला गेला आहे. तर छाब्रिया यांची बंगळुरू आणि सांताक्रुझमधील जमीन, सांताक्रुझ तीन कोटींचा फ्लॅट जप्त करण्यात आलेत.
हेलिकॉप्टर जप्त
पुण्यातले सुप्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना सीबीआयने एक मोठा दणका दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीआयकडून त्यांच्या प्रॉपर्टीवर टाच आली होती. सीबीआयने अविनाश भोसले यांना सर्वात मोठा दणका देत त्यांचे हेलिकॉप्टरही जप्त केलं आहे. मनी लॉन्ड्री प्रकरणातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू होता. सीबीआयकडून अनेकदा त्यांची चौकशी झाली होती. तसेच त्यांना अटकीही झाली होती. याच प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सीबीआयकडून कसूर करण्यात आली होती. हे प्रकरण आता दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी वाढवताना दिसताहेत. यात आणखी काही महत्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.