500 रूपये देवून अजित पवारांनी लोकांना सभेला आणलं; रोहित पवारांचा आरोप
Rohit Pawar on Ajit Pawar Sabha for Baramati Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. पैसे देऊन लोकांना सभेला आणल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. या वेळी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा पार पडल्या. बारामतीत महायुतीची जाहीर प्रचार सांगता सभा पार पडली. या सभेवर रोहित पवार यांनी टीका केली आहे. अजितदादांना हदय नाही. त्याला आम्ही काय करणार? लहानपणापासून त्यांना सांभाळालं त्यांना सोडून दादा गेले.अजित पवारांच्या सभेत 500 रूपये देवून लोकांना आलं होतं. मतदानांसाठी 3500 रूपये गरिबांना वाटले जात आहेत. मतदानासाठी श्रींमतांना 5 हजार रूपये वाटले जातात. पैसे वाटपातही ते हे करत आहेत. साडी देण्यात आली ती चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला ऊसाला भाव द्यायचा आहे, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांचा अजित पवारांवर शाब्दिक हल्ला
अजितदादांना विचारायचं सत्ता कुणामुळे आलेला आहात. शरद पवारसाहेब अख्या महाराष्ट्र फिरायचे. पद दिल्यानंतर निधी दिलेला आहे. महाविकास आघाडी कुणामुळे आलेली आहे. तीन ते साडे तीन लाखाचं लीड सुप्रिया सुळे निवडणुन येतील, असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांनी अजित पवारांचं अनुकरण करताना काय केलं एक डोळा मारला.
“हा तर विजयी सभेचा ट्रेलर”
सुप्रिया सुळे यांची 4 तारखेची विजयी सभा कशी असेल याचा ट्रेलर तुम्ही आज दाखवून दिलाय. काही लोकं म्हणतात पवार साहेब भाटकटी आत्मा आहे. या लोकांची आत्मा कोण असेल तर एकच नावं निघत ते म्हणजे शरद पवार… आई, काका, आत्या सर्वच जणांनी दादा आणि ताईचा प्रचार केला आहे. फक्त यावेळेस जरा चर्चा जास्त होत आहे. एक कुटुंबाचा व्यक्ती तिकडं भाजपसोबत गेली. याचा कुटुंबातील व्यक्ती म्हणून वाईट वाटतं. जाताना पक्ष नेला पण पवारसाहेबांची जागा कोण घेऊ शकत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर
रोहित पवारांच्या टीकेला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या सभेत विकासावर बोललं गेलं मात्र तिकडे नौटंकी दिसली. रोहित पवार बालिशपणा करतात. बालिशपणाचे वक्तव्य करतात. सुनेत्रा पवार यांचा नक्कीच विजयी होणार आहे. चांगल्या मताधिक्याने विजयी होणार आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.