7.30 ला टेक ऑफ केलं आणि अवघ्या काही मिनिटांत… पुण्यातील हेलिकॉप्टर अपघात कसा झाला? वाचा A टू Z माहिती

या हेलिकॉप्टरध्ये कॅप्टन गिरीशकुमार पिल्लई, कॅप्टन परमजीत सिंग असे दोन पायलट आणि प्रीतम भारद्वाज हा इंजिनिअर असे तीन जण प्रवास करत होते. या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

7.30 ला टेक ऑफ केलं आणि अवघ्या काही मिनिटांत... पुण्यातील हेलिकॉप्टर अपघात कसा झाला? वाचा A टू Z माहिती
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 12:15 PM

Pune Helicopter Accident Details : पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एक इंजिनिअर अशा तिघांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर धुके होते. या धुक्याचा अंदाज न आल्याने हे हेलिकॉप्टर कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे. पुण्यात ज्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, त्याच हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे प्रवास करणार असल्याची माहितीही या अपघातानंतर समोर आली. आता पुण्यातील हा हेलिकॉप्टर अपघात नेमका कसा घडला? याची माहिती समोर आली आहे.

हेलिकॉप्टर अपघात नेमका कसा झाला?

पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी 7.30 ते 7.45 च्या दरम्यान हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेनंतर सर्वांना मोठा धक्का बसला. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टरला दरीत कोसळले.

सध्या पुण्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र डोंगराळ भागात अजूनही धुके पसरले आहे. या हेलिकॉप्टरमधील पायलटने ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण घेतल्यानंतर त्यांना धुक्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वैमानिकाचा अंदाज चुकला आणि हेलिकॉप्टर थेट दरीत कोसळले. हे हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे होते. ऑगस्टा 109 असे या हेलिकॉप्टरचे नाव होते. या हेलिकॉप्टरध्ये कॅप्टन गिरीशकुमार पिल्लई, कॅप्टन परमजीत सिंग असे दोन पायलट आणि प्रीतम भारद्वाज हा इंजिनिअर असे तीन जण प्रवास करत होते. या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेचा एक व्हि़डीओही समोर आला आहे. या व्हिडीओत पुण्यातील डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याचे दिसत आहे. यानंतर त्या हेलिकॉप्टरचे अक्षरश: तुकडे झाले. या दुर्घटनेनंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. त्यामुळे या परिसरातून धुराचे लोट पसरल्याचे दिसत आहे.

तीन जणांचा मृत्यू

या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर तांत्रिक गोष्टींमुळे अपघात झाला असेल किंवा हलगर्जीपणा झाला असेल तर ती कारण शोधून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आम्ही याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. सध्या टेक्निकल टीमकडून या अपघाताची कारण शोधली जातील, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.