मागचं सव्वा वर्ष मी जे भोगतेय, ते…; जाहीर कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्याकडून खंत व्यक्त

Supriya Sule on Maharashtra Politics : हे सगळं प्रचंड अस्वस्थ करतंय...; गावभेटींदरम्यान सुप्रिया सुळे यांच्याकडून खंत व्यक्त... सुप्रिया सुळे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यावेळी वेगवेगळ्या गावांना त्या भेटी देत आहे. लोकांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी खंत बोलून दाखवली.

मागचं सव्वा वर्ष मी जे भोगतेय, ते...; जाहीर कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्याकडून खंत व्यक्त
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 8:44 AM

विनय जगताप, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, भोर- पुणे | 03 मार्च 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या मतदारसंघाचा दौरा करत आहेत. गावभेटींदरम्यान त्या लोकांशी संवाद साधत आहेत. यावेळी पवार कुटुंबाबाबत माध्यमांमध्ये वारंवार येणाऱ्या उलटसुलट बातम्यांवरून सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली. सव्वा वर्ष मी कायं भोगतीय ते कुणी भोगून दाखवावं. रोज आमचं खानदान त्या टीव्हीवर आहे. पार माझी पोरं पण सोडली नाहीत. माझ्या पोरांचा कायं संबंध आहे या राजकारणाशी? माझ्या नवऱ्याला आणि मुलांना प्रसिद्धी आवडतही नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ही एक खंत…

दररोज आमच्या खानदानाबद्दल लिहितात. आज हे बोलला, आज ते बोलला… आधी फार वाईट वाटायचं. दीड वर्ष आमच्या घरात हे चाललं आहे. पण आता मी ठरवलंय. आता एक दिवस टीव्हीवर दिसलो नाही तर वाईट वाटतं…, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यातील भोरमध्ये बोलत होत्या.

मनमोकळं बोलता येत नाही- सुळे

आज काल मन मोकळं भाषणचं करू शकत नाही. कारण ते सगळं रेकॉर्डिंग करतात. मला काही भाजपचे नेते भेटले होते, ते म्हणाले, कायं केलयं तुम्ही पवार कुटुंबाने… एक दिवस असा जात नाही की तुमच्याबद्दल टीव्ही काय नसतं… आम्ही पॅकेज घेऊन थकलो आणि तुमचं मोफत चालू आहे. त्यामुळं आता सगळ्यांच्या घरात पोचतोय, आपण असाच विचार करायचा. आम्हाला काय मजा येतीय का हे बघताना? कधी कधी मी माझ्या बहिणींना चिडवते. घरातले सगळे पुरुष दाखवतायत आमच्या, महिलांवर अन्याय होतोय. त्यांचेही फोटो लावा…, अशी मिश्किल टिपण्णी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

भोरमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पण हे सगळं आम्हाला प्रचंड अस्वस्थ करतयं. आम्हाला हे आवडत नाही. यासाठी आम्ही राजकारणात आलेलो नाही, असंही ोसुप्रिया सुळे म्हणाल्या. भोरमधील महाविकास आघाडीच्या बैठकी दरम्यान त्यांनी ही खंत व्यक्त केली.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून होत असलेल्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. तुमचा खासदार हा पारदर्शक आयुष्य जगतो. मी कुठे आहे हे 24 तास तुम्हाला माहिती असतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.