Pune BJP : लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवा, पुण्यातल्या उंड्रीत भाजपाचं राज्य सरकारविरोधात ‘कंदील’ आंदोलन

सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका यावेळी भाजपाच्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. महावितरण कंपनीच्या अघोषित भारनियमनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

Pune BJP : लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवा, पुण्यातल्या उंड्रीत भाजपाचं राज्य सरकारविरोधात 'कंदील' आंदोलन
भारनियमन (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 10:51 AM

पुणे : अघोषित लोडशेडिंग (Load Shedding) आणि वीजवसुलीच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. पुणे जिल्हा भाजपाकडून पुण्यातील उंड्री (Undri) चौकात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाने कंदील आंदोलन केले आहे. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवण्याची मागणी यावेळी भाजपा (BJP) कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. महावितरण कंपनीच्या अघोषित भारनियमनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. कोळसाटंचाई असल्याने राज्य सरकारकडून भारनियमन केले जात आहे. त्यावरून भाजपाने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. वीजपुरवठा त्वरीत सुरळीत करावा, भारनियममन करू नये, अशी मागणी यावेळी भाजपाच्या आंदोलकांनी राज्य सरकारकडे केली आहे.

आशिष शेलार यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

भाजपा नेते आशिष शेलार यांनी नुकतीच पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. राज्यात भारनियमन विषय जोरात आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आधी अघोषित भारनियमन होते. आता तर मंत्र्यांनी अधिकृत केले आहे. तीन पक्ष आणि त्यात नसलेला समन्वय याचे दुष्परिणाम महाराष्ट्र भोगत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. वीजप्रश्नावरून टीका करताना, यासंबंधी भाजपा आक्रमक असून आता आंदोलनही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते.

रावसाहेब दानवेंकडूनही टीकास्त्र

कोळशाची टंचाई केवळ नियोजनाअभावी सहन करावी लागत आहे. यासंबंधी आम्ही जानेवारीत पत्र लिहून सांगितले होते, की कोळशाचे नियोजन करा, 15 दिवसाचे नियोजन हवे. मात्र हे तीन पक्षाचे सरकार आहे. कधी ते एकत्र बसत नाहीत. वेळ आली, की केंद्र सरकारवर खापर फोडतात. त्यांना केंद्र सरकारविरोधात बोंबलण्याचे कामच सुरू असल्याची टीका रावसाहेब दानवेंनी पुण्यात केली होती.

आणखी वाचा :

Pune crime : मोबाइल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक, पिंपरी चिंचवडमधला प्रकार; चोरटे पसार

20 किमीसाठी 80 किमीची टोलवसुली थांबवा, अन्यथा…; पुण्याच्या खेड-शिवापूर टोलनाक्याविरोधात कृती समितीनं काय इशारा दिला, वाचा…

Aurangabad | औरंगाबाद ते पुणे अंतर सव्वा तासात पार होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची काय घोषणा?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.