Pune BJP Vs NCP : केंद्रीय मंत्री असुरक्षित, मग सामान्यांचं काय? घोषणाबाजी करत भाजपाचे राष्ट्रवादीविरोधात पुण्यात आंदोलन
भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादीविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. महाविकास आघाडी सरकारची दंडुकेशाही सुरू आहे. या दंडुकेशाहीविरोधात हे आंदोलन आहे. राष्ट्रवादीच्या गुंडगिरीविरोधात हे आंदोलन असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले आहे.
पुणे : एकीकडे बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीतर्फे भाजपाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीविरोधात अलका चौकात भाजपा आंदोलन (BJP agitation) करत आहे. राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध म्हणून हे आंदोलन करत असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा (Pune Police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी महाविकास आघाडी तर विशेषत: राष्ट्रवादीचा यावेळी निषेध करण्यात आला येत आहे. भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात ठोकशाही, दंडुकेशाही सुरू असून हे चालणार नाही. राज्यातील अराजकतेला जबाबदार असलेल्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध अशा घोषणा देऊन हे आंदोलन करण्यात येत आहे.
भाजपाकडून घोषणाबाजी
भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादीविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. महाविकास आघाडी सरकारची दंडुकेशाही सुरू आहे. या दंडुकेशाहीविरोधात हे आंदोलन आहे. राष्ट्रवादीच्या गुंडगिरीविरोधात हे आंदोलन असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले आहे.
महिला कार्यकर्त्याही आक्रमक
केंद्रीय मंत्री जिथे असुरक्षित असतील तिथे सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार, अशी पोस्टरबाजी करण्यात आली. भाजपाचे जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तर महिला कार्यकर्त्याही आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या.
गुन्हे दाखल झाले, ही तर गुंडगिरी म्हणत भाजपाकडून निषेध
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झालेल्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेची दखल घेत डेक्कन पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओ क्लीप्सच्या माध्यमातून तिघांवर कारवाई केली.
स्मृती इराणींच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्यानंतर उफाळून आला वाद
323, 354, 504 , 506 आणि कलम 34नुसार ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र ही राष्ट्रवादीची गुंडगिरी असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. स्मृती इराणींच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्यानंतर हा सर्व वाद उफाळून आला आहे. भाजपाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यानंतर भाजपाचा निषेध करत राष्ट्रवादीनेही आंदोलन केले आहे.