घराघरात पोहोचण्यासाठी भाजपची विशेष रणनिती; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी खास प्लॅनिंग

BJP Leader Murlidhar Mohol Camping Planning For Loksabha Election 2024 : पुण्यात निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. अशात घरोघरी पोहोचण्यासाठी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचं खास प्लॅनिंग केलं आहे. कसं पोहोचणार घरोघरी? कसा करणार प्रचार? वाचा सविस्तर...

घराघरात पोहोचण्यासाठी भाजपची विशेष रणनिती; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी खास प्लॅनिंग
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 3:23 PM

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचार यंत्रणा जोरात कामाला लागल्या आहेत. पुण्यातही प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशात घराघरात प्रचार करण्यासाठी भाजपने विशेष रणनिती आखली आहे. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात भाजपकडून ‘घर चलो अभियान’ राबवण्यात येणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजप पुणे शहरात 3 लाख घरांमध्ये वाटणार एक विशेष पत्रकं वाटली जाणार आहेत. 6 एप्रिलला भाजपचा वर्धापन दिन आहे. या दिवशी प्रत्येक घरात भाजप वाटणार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराचं पत्रक वाटणार आहे.

अभियानाला कोण-कोण हजेरी लावणार?

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील देखील या ‘घर चलो अभियान’ अभियानात सहभागी होणार आहेत. पुण्यातील महायुतीचे सर्व स्थानिक आमदारदेखील घरोघरी जात पत्रकं वाटणार आहेत. 10 ते 12 लाख नागिरकांना भाजप पत्रक देणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपने नवी रणनीती आखली आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या अभियानाबाबत माहिती दिली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आम्ही ‘घर चलो अभियान’ आम्ही राबवत आहोत. 6 एप्रिलला प्रत्येक घरात आम्ही पत्रकं वाटणार आहोत, असं धीरज घाटे म्हणाले.

पुणेकर भाजपला मतदान करणार- घाटे

भाजपचे पुणे शहरात मतदान वर्षानुवर्ष पुणेकर भाजपला मतदान करतात. आमच्याकडे अजितदादांसारखं तगड नेतृत्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतकं चांगलं काम करत आहेत. आरपीआयची ताकद आमच्यासोबत त्यामुळे हे सगळे एकत्रित मिळून मुरलीधर मोहोळ यांना खासदार करतील. मुरलीधर मोहोळ यांना मोठे मताधिक्य राहील. 20 ,21 एप्रिल नंतर पुणे लोकसभेचा फॉर्म भरला जाईल. महायुतीचे सर्व नेते मोहोळ यांचा फॉर्म भरायला उपस्थित राहतील, असंही धीरज घाटे म्हणाले.

देशात एकच पॅटर्न सुरू आहे, तो म्हणजे मोदी पॅटर्न… मोदी पॅटर्न समोर बाकीचे सगळे पॅटर्न फिके आहेत. पुण्यात केवळ मोदीजींचाच पॅटर्न चालेल. देशातल्या जनतेला मोदीजींमध्ये आश्वासक चेहरा दिसतो. म्हणून मोदी पुन्हा निवडून येतील आणि पंतप्रधान होतील, असा विश्वास धीरज घाटे यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.