Pune Byelection : पुणे पोटनिवडणुकीत सर्वात मोठा उलटफेर, आता येणार खरी मजा, नेमकं झालंय तरी काय?

चिंचवड, कसब्याच्या पोटनिवडणुकीत (Pune By-election) आता फायनल लढत निश्चित झालीय आणि चिंचवडमधून राष्ट्रवादीचं आणि कसब्यामधून भाजपचं टेन्शन कायम राहिलं.

Pune Byelection : पुणे पोटनिवडणुकीत सर्वात मोठा उलटफेर, आता येणार खरी मजा, नेमकं झालंय तरी काय?
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 10:43 PM

पुणे : चिंचवडच्या पोटनिवडणुकीत (Pune By-election) राष्ट्रवादीसमोर आला दुहेरी आव्हान असेल अर्ज मागे घेण्याची मुदत संपलीय पण बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही तर कसब्यात आनंद दवेंनीही उमेदवारी मागे न घेतल्यानं, भाजपचंही टेन्शन वाढवलंय. पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट.

चिंचवड, कसब्याच्या पोटनिवडणुकीत (Pune By-election) आता फायनल लढत निश्चित झालीय आणि चिंचवडमधून राष्ट्रवादीचं टेन्शन कायम राहिलं. कारण बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. तर इकडे कब्यसात आनंद दवेंनीही भाजपची विनंती फेटाळलीय. चिंचवड आणि कसब्यातही आता तिरंगी लढत होणार आहे.

चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंमध्ये लढत होणार आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि हिंदू महासभेचे अपक्ष उमेदवार आनंद दवेंमध्ये लढत असेल चिंचवडमधून राहुल कलाटेंनी माघार घ्यावी, यासाठी अनेक प्रयत्न झाले.

अजित पवारांनी विनंती केली, उद्धव ठाकरेंचाही कलाटेंना फोन गेला चिंचवडमध्ये ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर कलाटेंना भेटले..मात्र कलाटे ठाम राहिले. राहुल कलाटे आधी शिवसेनेत होते त्यांनी शिवसेनेकडूनही निवडणूक लढवलीय. 2019 मध्ये राष्ट्रवादीनं त्यांना चिंचवडमधून पुरस्कृत केलं होतं. त्यावेळी लक्ष्मण जगतापांना 1 लाख 50 हजार 23 मतं तर कलाटेंना 1 लाख 12 हजार 225 मतं मिळाली. 37 हजार 798 मतांनी विजय मिळवत जगतापांनी आमदारकीची हॅटट्रिक केली होती. मात्र 1 लाख 12 हजार मतं लक्षवेधी ठरली होती.

आता तर कलाटेंनी एकतर्फी विजयाचा दावा केलाय. चिंचवडमध्ये कलाटेंनी राष्ट्रवादीची धाकधूक वाढवलीय..तर कसब्यात आनंद दवेंनीही भाजपला आव्हान दिलंय…दवेंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपनं प्रयत्न केले. मात्र दवेंनीही आपला अर्ज मागे घेतला नाही. कसब्यात मुक्ता टिळकांच्या निधनानंतर, त्यांच्या घरी किंवा दुसरा ब्राह्मण उमेदवार न दिल्यानं दवेंनी अपक्ष अर्ज भरलाय.

भाजपनं कसब्यातून हेमंत रासनेंना तिकीट दिलंय. त्यामुळं कसब्यात ब्राह्मण उमेदवार का नाही, असा सवाल करणारे पोस्टरही लागले होते…आता दवेंच्या उमेदवारीनं मतांमध्ये फूट पडून भाजपला फटका बसेल अशी चर्चा आहे. अर्थात मतदारांच्या मनात काय हे EVM मशिनमध्येच फिट होईल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.