Pune By-election : ज्याची भीती होती तेच झालं, कसबानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये मोठा ट्विस्ट

भाजपने टिळक यांच्या घरात उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंब नाराज होतं. फडणवीसांनी यातून मार्ग काढला. मात्र आता पिंपरी चिंचवडमध्ये मविआसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे.

Pune By-election : ज्याची भीती होती तेच झालं, कसबानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये मोठा ट्विस्ट
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 4:25 PM

पुणे : पुण्यातील (Pune By-election) दोन्ही मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दोन्ही मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपकडे असणाऱ्या या जागा मविआ आपल्याकडे घेण्यसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजप आपल्या दोन्ही जागा राखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. कसबा मतदारसंघात (Kasaba By-election) भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. भाजपने टिळक यांच्या घरात उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंब नाराज होतं. मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची नाराजी दूर केली. भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला होता मात्र फडणवीसांनी यातून मार्ग काढला. मात्र आता पिंपरी चिंचवडमध्ये मविआसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे.

नेमकं काय झालंय?

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने आश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून आश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केला आहे. पण, त्यांनी एबी फॉर्म दिला नाही त्यामुळे त्यांचा अपक्ष अर्ज राहणार आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले आहेत.

राहुल कलाटे यांनी आपण काही झालं तरी अर्ज मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे. मी या ठिकाणी दोनवेळा विधानसभा लढलो असून इथल्या नागरिकांची विशेषत: तरूणांची जी लोकभावना आहे त्याचा मी अनादर करू शकत नाही, असंही राहुल कलाटे म्हणाले.

मविआ ही निवडणूक एकत्र लढवत असून नाना काटे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता कलाटे यांनी माघार घेणार नसल्याचं सांगितल्यामुळे महाविकास आघाडीची गोची झाली आहे.

दरम्यान, उद्या सचिन आहिर आणि राहुल कलाटे यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर राहुल कलाटे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गुरूवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. जर कलाटे आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. तर भाजपला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे उद्याच्या कलाटे आणि आहिर यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.