पुण्यातील ‘हा’ पूलही दिल्लीतील ट्विन टॉवरसारखाच पाडणार; 9 सेकंदात पूल होणार जमीनदोस्त
चांदणी चौकातील हा पूल बंद करण्यात आल्यानंतर ज्या नागरिकांना बावधान आणि पाषाणकडे जायचे आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. येणाऱ्या 18 सप्टेंबर रोजी पहाटे हा पूल पाडण्यात येणार आहे.

पुणेः पुण्यातील चांदणी चौकातील ( Pune Chandani Chowk) वाहतूक कोंडीला कारणीभूत असणारा पूल अखेर 18 रोजी पाडण्यात येणार आहे. त्यासाठी या पुलावरून होणारी वाहतूक आजपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लवकरच हा पूल पाडण्यात येणार असल्याने प्रायोगिक तत्त्वावर आजपासून इथल्या वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे. पूल (Bridge) पाडण्यात आल्यानंतर येथील वाहतूक व्यवस्थेत काय बदल होणार हेही वाहतूक नियंत्रण विभागाकडून स्पष्ट केले जाणार आहे. हा पुलही काही सेकंदात पाडला जाणार असल्याने त्याकडे साऱ्या पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
हा पूल बंद करण्यात आल्यानंतर ज्या नागरिकांना बावधान आणि पाषाणकडे जायचे आहे अशा नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. येणाऱ्या 18 सप्टेंबर रोजी पहाटे हा पूल पाडण्यात येणार असून दिल्लीतील ट्विन टॉवर ज्या कंपनीने पाडले त्याच कंपनीला हा पूल पाडण्याचे कॉन्टॅक्ट देण्यात आले आहे.
पुण्यातील पूल 9 सेकंदात पडणार
अवघ्या 9 ते 10 सेकंदात हा पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व पूर्वतयारी म्हणून आता चांदणी चौकात तयारी सुरू करण्यात आली आहे. हा पूल नऊ ते दहा सेकंदात पाडला जाणार असल्याने परिसरातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून यासाठी प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे.
वाहतुकीत बदल
सध्या प्रायोगिक तत्त्वावर येथील वाहतूक वळविण्यात आली असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडणार आहे. यासाठी वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे सागंण्यात आले आहे.