Chandrayaan 3 : पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! चांद्रयान 3 चं लॅंडिंग पाहण्यासाठी खास सोय; कुठे? वाचा…

| Updated on: Aug 23, 2023 | 9:47 AM

Chandrayaan 3 Land on Moon Time : चांद्रयान 3 लँडिंगसाठी सज्ज. हे लँडिंग पाहण्यासाठी पुणेकर सज्ज; 'या' ठिकाणी केलीय विशेष सोय, कुठे पाहता येणार? दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक, वाचा सविस्तर...

Chandrayaan 3 : पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! चांद्रयान 3 चं लॅंडिंग पाहण्यासाठी खास सोय; कुठे? वाचा...
Follow us on

पुणे | 23 ऑगस्ट 2023 : आज देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण चांद्रयान 3 ही मोहिमेचा आज महत्वाचा टप्पा आहे. आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चांद्रभूमीला स्पर्श करेल. लँडिंगच्या दोन तासआधी लँडिंग मॉड्युलची तपासणी केली जाईल. नंतर हे यान लँड होईल. हे लँडिंग पाहण्यासाठी अवघे भारतीय उत्सुक आहेत. हे लँडिंग पाहण्यासाठी ठिकठिकाणी सोय करण्यात आली आहे. पुणेकरांसाठीही खास सोय करण्यात आली आहे. पुण्यात ठिकठिकाणी चांद्रयान 3 चं लँडिंग पाहण्यासाठी आयोजन करण्यात आलं आहे.

कुठे पाहता येणार लँडिंग?

‘चांद्रयान 3’ चं लॅन्डिंग पुणेकरांना पाहता येणार आहे. शहरात अनेक ठिकाणी सोय करण्यात आली आहे. काही शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि खासगी संस्थांमध्येही आयोजन करण्यात आलं आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनसीआरए’ सभागृहात संध्याकाळी 6 वाजता मोठ्या पडद्यावर हे लँडिंग पाहण्याची सोय करण्यात आली आहे.

सदाशिव पेठेतील टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्येही हजारो विद्यार्थ्यांना ‘चांद्रयान 3’ चं लँडिंग लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. या ठिकाणी दुपारी 4 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल. लॉ कॉलेज रोडवरच्या एनएफएआय या संस्थेमध्येही चांद्रयान 3 चं लँडिंग पाहता येणार आहे.

तर पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्कुलमधील विद्यार्थ्यांना चंद्रयान 3 चे लँडिंग पाहण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. इथेही हे लँडिंग दाखवण्यात येणार आहे.

भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी. या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश मिळावं, यासाठी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक घालण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे अभिषेक करण्यात आला. दूध, दही, विविध फळांचे रस, सुकामेवा आणि इतर वस्तूंच्या सहाय्याने हा अभिषेक करण्यात आला.

आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावं, यासाठी हा अभिषेक करण्यात आला. याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आलं होतं. मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली.