महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी छगन भुजबळांनी OBC आरक्षणासाठी हुंकार भरला; म्हणाले, हारी हुई बाजी…

Chhagan Bhujbal on OBC Reservation : महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी छगन भुजबळांनी OBC आरक्षणासाठी हुंकार भरला; म्हणाले, हारी हुई बाजी...
छगन भुजबळ, नेते राष्ट्रवादी अजित पवार गटImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 3:01 PM

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले यांचा आज 134 वा स्मृतिदिन आहे. या दिवसाचं औचित्य साधून पुण्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि कवी नागराज मंजुळे यांना यंदाचा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ देण्यात आला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी छगन भुजबळ आणि नागराज मंजुळे यांनी मनोगत व्यक्त केलं. तेव्हा छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य केलं आहे.

भुजबळांकडून नागराज मंजुळेंचं कौतुक

नागराज मंजुळे यांचे आभार मानतो, त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नाशिकमधील कार्यक्रम करून या ठिकाणी आलो, हे आपलं प्रेरणास्थान आहे. वैचारिक ताकत वाढवण्यासाठी ह्या पॉवर स्टेशनला आपण भेट देत असतो. चित्रपट काढणारे, कवी, दिग्दर्शक खूप आहेत, पण पुरस्कार यांनाच का? सामाजिक प्रश्न लोकांसमोर मांडून लोकांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलंय, असं म्हणत छगन भुजबळ यांनी नागराज मंजुळे यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.

फुलेंची शाळा लवकरच सुरु करणार

सावित्रीबाई फुलेंची शाळा लवकर सुरु होणार आहे. ओबीसी समाज्यातील MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 553 कोटी रुपये दिले आहेत. आम्ही मराठा सामाज्याच्या विरोधात नाही. 3 वेळा आरक्षण दिलं. 10 टक्के ईडब्लूएस आरक्षण दिलं आहे. पण त्यांच्याकडून सात्यत्याने घर जाळली जात आहेत. माझ्या निवडणुकीला पण ते आले. एका घरी सांत्वन करण्यासाठी ते रात्री 2 वाजेपर्यंत बसले होते, असं म्हणत भुजबळांनी मनोज जरागेंवर आरोप केला आहे.

ओबीसी सामाज्याच्या लोकांनी छगन भुजबळला मतदान केलं. आपली लढाई संपली नाही…. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे अख्या महाराष्ट्राला सांगतोय. मराठा समाज्याच्या हक्काचे त्यांना भेटलं पाहिजे. गेले वर्ष दीड वर्ष आपण अडचणीचे दिवस पाहतोय…. बीडमध्ये लोकांची घर जाळली गेली.मी 16 नोव्हेंबरला माझ्या मंत्री पदाचा राजीनामा देऊन… शडू ठोकला. राजीनामा दिलाय उल्लेख करू नका मला सांगितलं जात होतं… अडीच महिण्यानंतर उल्लेख करावा लागला… आमचा एक योद्धा हरी नरके दीड वर्षापूर्वी गेला,असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.