पत्नीच्या आत्महत्येनंतर तिसऱ्या दिवशी पतीनेही घेतला गळफास; पाच महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह
पत्नीने आत्महत्या केली म्हणून व तिचा विरह सहन झाला नसल्याने तिच्या पतीनेही बुधवारी गणेशनगर, डांगे चौक येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस केले. दोघा पती पत्नीने आत्महत्या केली असल्याने दोघांच्या घरच्यानाही जबर मानसिक धक्का बसला आहे.
पिंपरी : प्रेम विवाह (love marriage) झाल्यानंतर अवघ्या पाचच महिन्यात रविवारी (ता.10) नवविवाहीत युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना चिंचवड (Pune Chinchwad) येथे घडली तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पत्नीने आत्महत्या केली म्हणून व तिचा विरह सहन झाला नसल्याने तिच्या पतीनेही बुधवारी गणेशनगर, डांगे चौक येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस केले. दोघा पती पत्नीने आत्महत्या केली असल्याने दोघांच्या घरच्यानाही जबर मानसिक धक्का बसला आहे.
नवविवाहित दांपत्य डांगे चौक येथे राहणारे होते. आत्महत्या केलेल्यांची अक्षय अंबिलवादे आणि अश्विनी जगताप-अंबिलवादे अशी त्यांची नावे आहेत.
प्रेमसंबंधातून विवाह
अक्षय आणि अश्विनी डांगे चौक येथील गणेशनगरमध्ये लहानाचे मोठे झाले होते. या दोघांनीही खिंवसरा पाटील या मराठी माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांच्या मध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे एकमेकांवर प्रेम करत असल्याने त्यांनी विवाह करण्याचे ठरवले होते. विवाह करण्यासाठी त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन 29 नोव्हेंबर 2021 रोजी थाटात प्रेमविवाह केला.
अक्षयला जबर मानसिक धक्का
विवाहित असलेला अक्षय चिंचवड येथील एका सराफाच्या दुकानात नोकरी करत होता. नोकरी करत असल्यामुळे ती दोघंही चिंचवड येथे दोघंही राहत होते. मात्र विवाह होऊन काही दिवस झालेले असतानाच अश्विनीने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनीच्या आत्महत्येनंतर अक्षयला जबर मानसिक धक्का बसला होता.
मित्र घरी जाताच आत्महत्या
दोघांनीही प्रेमविवाह केला असल्याने तो प्रचंड दुःखी होता. अक्षयची पत्नीने आत्महत्या केल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केले गेल्यानंतर अक्षयला त्याच्या आई वडिलांनी आपल्या घरी डांगे चौक येते आणले होते. अक्षयला मानसिक धक्का बसा आहे हे त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या मित्रानांही माहिती होते. म्हणून अक्षयला कुणीही सोडून राहत नव्हते. त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न सगळेच जण करत होते मात्र, बुधवारी सकाळी मित्र अंघोळीसाठी निघून गेल्यानंतर तेवढ्या कालावधीत अक्षयने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
संबंधित बातम्या
tv9 Special: राज ठाकरेंवर भूमिका बदलाचे आरोप का होतात? कारण समजून घेण्यासाठी हे पाहावंच लागेल!
महिलांना बलात्काराची धमकी देणारा बजरंग मुनिला अटक; गुन्हा दाखल होताच महिलांची माफी