VIDEO | बाईकच्या धडकेनंतर आग, पुण्यात सीएनजी बस जळून खाक

अपघातानंतर लगेचच बसमधून धूर यायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता दुचाकीसह बसने पेट घेतला (Pune CNG Bus accident fire)

VIDEO | बाईकच्या धडकेनंतर आग, पुण्यात सीएनजी बस जळून खाक
पुण्यात सीएनजी बसला अपघातानंतर आग
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 1:33 PM

पुणे : बीआरटी मार्गात घुसलेल्या बाईकची पीएमपीएलएमच्या सीएनजी बसला जोरदार धडक बसली. त्यामुळे दुचाकीसह सीएनजी बसने पेट घेतला. यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Pune CNG Bus Two wheeler accident bus catches fire)

पुण्यातील वारजे माळवाडीहून निघालेली ही बस वाघोलीच्या दिशेने जात होती. बीआरटी मार्गात दुचाकी घुसल्यावर ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी बसला धडकली. ही धडक इतकी जोराची होती की दुचाकी बसच्या खालच्या बाजूला अडकून राहिली.

आधी धूर, मग सीएनजी बस पेटली

अपघातानंतर लगेचच बसमधून धूर यायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता दुचाकीसह बसने पेट घेतला. काही कळायच्या आताच आगीने रौद्र रुप घेतलं. मात्र वाहक आणि चालकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने बसमधील प्रवाशांना खाली उतवरलं गेलं.

अपघातात बस जळून खाक झाली असली तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

पाहा व्हिडीओ :

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गेल्या मंगळवारीच विचित्र अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. टेम्पो, ट्रेलर, कारसह अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला होता.

पुण्याहून मुंबईकडे जाताना बोरघाट उतरताना फूड मॉलजवळ हा अपघात झाला होता. या अपघातातील दोन जखमींना अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलवण्यात आले होते. (Pune CNG Bus Two wheeler accident bus catches fire)

कसा घडला होता अपघात?

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताचे दोन्ही कारचा चक्काचूर झाला होता.

या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु, घाटात मुंबईकडे जाताना दोन कार पुढे निघून गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला

संबंधित बातम्या :

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला

कार-बसची समोरासमोर धडक, अहमदनगरमध्ये भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

(Pune CNG Bus Two wheeler accident bus catches fire)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.