पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुण्यातील तब्बल 60 CNG पंप आज बंद राहणार, कारण…

नेहमीप्रमाणे सीएनजी भरायला पंपावर जाल, पण आजचा दिवस नेहमीसारखा नसेल! कारण आज पुण्यातली 60 सीएनजी पंप बंद राहणार आहेत.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुण्यातील तब्बल 60 CNG पंप आज बंद राहणार, कारण...
पुण्यातील सीएनजी पंप आज बंदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 8:46 AM

अश्विनी सातव डोके, TV9 मराठी, पुणे : पुण्यात सीएनजीवर (Pune CNG pump Strike) चालणाऱ्या वाहनांना आज मनस्तापाला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे. कारण पुण्यातील तब्बल 60 सीएनजी पंप आज एक दिवसासाठी बंद (Pune CNG Closed Today News) राहणार आहे. या सीएनजी पंपधारकांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. डीएलरच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात न आल्यानं पुण्यातील पंपचालकांनी निषेध म्हणून संप (Pune Strike) पुकारलाय.

पेट्रोल डीलर असोसिएसनच्या वतीने हा एक दिवसाचा संप पुकारण्यात आलाय. त्यामुळे पुण्यातील अन्य सीएनजी पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागून अनेकांचा खोळंबा होण्याची शक्यताय. पुण्यातील टोरेंट सीएनजी स्टेशन आज एक दिवसासाठी बंद राहतील, असा इशारा ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आला होता. डीलर कमिशनमध्ये वाढ करावी, अशी या असोसिएशनची प्रमुख मागणी आहे.

सात दिवस आधीच कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीचं पत्र देण्यात आलं होतं. मात्र ही मागणी काही मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर टोरेंट सीएनजी स्टेशन असलेले सर्व सीएनजी पंप आज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

आजच्या संपामध्ये एकूण 60 सीएनजी पंप सहभागी झाल्याची माहिती मिळतेय. याचा फटका इतर पंपांवर जाणवण्याची दाट शक्यता आहे. पुण्यात सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पुण्यात सीएनजीवर वाहनं चालवण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. अशावेळी एक दिवसाच्या संपाचा फटका अनेकांना बसणार आहे.

दरम्यान, टोरेंट सीएनजी पंप जरी एक दिवसासाठी बंद असले, तरी दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल पंप सुरुच राहणार आहेत. त्यामुळे वाहन चालकांना एक दिवस पेट्रोल-डिझेलच्या पर्यायवर वेळ मारुन नेता येऊ शकेल. पेट्रोल, डिझेलच्या पंपाचा एक दिवसाच्या सीएनजी संपाशी कोणताही थेट संबंध नसल्यानं पुणेकरांना दिलासा मिळालाय.

दरम्यान, ज्या सीएनजी पंपावर एमएनजीएलकडून पुरवठा केला जातो, ते सीएनजी पंप सुरुच राहणार आहेत. त्यामुळे ज्यांनी सीएनजीवरच गाडी चालवायची आहे, त्यांना आणकी एक पर्यायही खुला असणार आहे.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.