लोणावळ्यातील दुकाने रात्री 9 पर्यंत राहणार खुली, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
लोणावळा शहरातील सर्व दुकाने रविवार (11 ऑक्टोबर) पासून रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
लोणावळा(पुणे) : लोणावळा शहरातील सर्व दुकाने रविवार (11 ऑक्टोबर) पासून रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातील दुकाने देखील सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत खुली राहतील. (Pune Collector orders shops will open till 9 pm in Lonavala )
राज्यात सध्या सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने टप्प्या टप्प्याने निर्बंध कमी केले जात आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या पुणे महानगरपालिका हद्दीत लॉकडाऊन पाच मध्ये सर्व दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान खुली ठेवण्याचा आदेश नुकताच आयुक्तांनी दिला होता. त्यानंतर ग्रामीण भागातील व्यावसायकांनी देखील दुकाने बंद करण्याची वेळ वाढवावी अशी मागणी केली होती. या मागणीचा आदर करत व अनलॉक प्रक्रियेत निर्बंध कमी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायत हद्दीतली सर्व दुकाने यापुढे सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीमध्ये खुली राहतील, असा आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिला आहे.
शनिवारी सकाळी लोणावळा व्यापारी आघाडीच्या अध्यक्षांनी प्रांत अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार दुकाने रात्री पर्यत खुली ठेवण्याचा संदेश सोशल मीडियावरून दिला होता. मात्र, याबाबत लोणावळा नगरपरिषदेला काहीच कल्पना नसल्याने त्यांनी व्यापारी आघाडी अध्यक्षांना नोटीस बजावत खुलासा मागवला होता. यामुळे शनिवारी आणि आज दुपारपर्यत शहरातील सर्व व्यावसायिकांमध्ये दुकाने बंद करण्याच्या वेळेवरून संभ्रम निर्माण झाला होता.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे व्यापार्यांचा संभ्रम दूर झाला असून शहरातील सर्व दुकाने आता रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. दारुची दुकाने, बार व रेस्टाँरंट यांना रात्री दहापर्यंत वेळ देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
पर्यटन बंदीतही नियम चुकवत थेट ‘वाशी टू लोणावळा’ रिक्षाने प्रवास, सात जण ताब्यात
लोणावळा फिरण्याची हौस नडली, 12 पर्यटकांवर कारवाई
(Pune Collector orders shops will open till 9 pm in Lonavala )