पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात, तूर्तास लॉकडाऊन नको : महापौर

त्यामुळे तूर्तास लॉकडाऊन नको, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. (Pune Corona murlidhar mohol)

पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात, तूर्तास लॉकडाऊन नको : महापौर
पुणे महानगरपालिका आणि कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 8:20 AM

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत  असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे तूर्तास लॉकडाऊन नको, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. (Pune Corona situation is under control no need to lockdown immediately said murlidhar mohol)

“पुण्याची रुग्णसंख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात असून तूर्त लॉकडाऊन व्यवहार्य ठरणार नाही, अशी माझी भूमिका आहे. टाटा समाजशास्त्र संस्था आणि ‘आयसर’ ने केलेल्या अभ्यासातही पूर्णतः लॉकडाऊन ऐवजी निर्बंध वाढवावेत, असं सुचवलं आहे,” असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

“आताच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, टेस्टिंग वाढवणे आणि लसीकरण व्यापक स्वरूपात करणे आपण यावर वेगाने काम करत आहोत. त्यामुळे पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा आणखी कडक नवे निर्बंध लावता येतील का? यावर चर्चा अपेक्षित आहे,” असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.

(Pune Corona situation is under control no need to lockdown immediately said murlidhar mohol)

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटस्पॉटची शंभरी

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटस्पॉटने शंभरी गाठली आहे. अवघ्या दहा दिवसात पुणे ग्रामपंचायतीची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामध्ये हवेली, जुन्नर, खेड, मुळशी या तालुक्‍यांतील हॉटस्पॉट ग्रामपंचायतींची संख्या तब्बल दहाच्या पुढे आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला.

गेल्या महिन्याभरात ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीतील दहापेक्षा अधिक करोनाबाधित संख्या असलेल्या 46 ग्रामपंचायतींचा समावेश होता. त्यानंतर चारच दिवसांत या हॉटस्पॉट संख्येमध्ये 21 ने वाढ झाली. मात्र या संख्येने आता तब्बल शंभरीचा आकडा गाठला आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती

पुण्यात काल दिवसभरात 3 हजार 98 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 698 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात काल मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात काल दिवसभरात 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 9 मृत हे पुण्याबाहेरील असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुण्यात सध्या 24 हजार 440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 555 जण गंभीर आहेत. (Pune Corona situation is under control no need to lockdown immediately said murlidhar mohol)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown latest update : रुग्णसंख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन निश्चित, दोन दिवसांत निर्णय – राजेश टोपे

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 28 हजार 699 रुग्ण, मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ!

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, खासगी रुग्णालयांकडून बेड राखीव ठेवण्यास नकार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.