पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम दिसून येत आहे. राज्यातील मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांसाठी बेड्सची संख्या कमी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर महापालिकेनं सीसीसीचे 5 हजार बेड तयार करण्याचे नियोजन केल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.(5000 CCC beds will be made for corona patients in Pune)
पुणे शहरातील कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बेड्सची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची गरज, लसीकरण मोहिमेला व्यापक रूप देणे, यावर सविस्तर आढावा आज महापौरांनी घेतला. तशी माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
पुणे महानगरपालिका तयार करणार ५ हजार सीसीसी बेड्स !
कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेड्सची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची गरज, लसीकरण मोहिमेला व्यापक रूप देणे, यावर सविस्तर आढावा घेतली. pic.twitter.com/HAeTOyJ09L
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 31, 2021
शहरातील सर्व खासगी रुग्णालयाचे ८० टक्के बेड्स ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 7 हजार बेड्स कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय महापालिकेने सीसीसीचे 5 हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केलं आहे. त्यापैकी 1 हजार 250 बेड्स उपलब्ध झाले आहेत. शिवाय 1 हजार 450 बेड्सची तयारी सुरु आहे, असंही महापौरांनी सांगितलं आहे.
डॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे आणि गरजूंना कमीत कमी वेळेत बेड उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत. शिवाय लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून व्यापकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत सूचना केल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुण्यातील कोरोना स्थिती इतकी विदारक बनली असताना दुसरीकडे आरोग्य विभागासमोर बेड्सची समस्या निर्माण झाली आहे. पुणे शहरात साधारणपणे 5 हजार 8 बेड्स उपलब्ध आहेत. त्यातील सध्या केवळ 490 बेड शिल्लक आहेत. त्यात साध्या बेड्सची संख्या 243, ऑक्सिजन बेड 217, आयसीयू बेड 20 तर व्हेंटिलेटर बेड 10 आहेत. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शहरात साधारण 2 हजार 682 बेड कमी पडत आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या :
Pune Corona Update : पुणे देशात अव्वल, समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर
Pune Corona Update : पुण्यात कोरोनाचा कहर, प्रमुख रुग्णालयांमध्ये मात्र बेड्सची कमतरता!
5000 CCC beds will be made for corona patients in Pune