पुण्याच्या इंदापुरात कोरोना वाढतोय, 3 दिवसांमध्ये 150 रुग्णांची नोंद, मृत्यूदर वाढल्यानं चिंता वाढली
इंदापूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. मागील तीन दिवसांत कोरोना बाधितांची संख्या 150 वर पोहोचली आहे. इंदापूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने इंदापूर तालुक्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
पुणे: जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. मागील तीन दिवसांत कोरोना बाधितांची संख्या 150 वर पोहोचली आहे. इंदापूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने इंदापूर तालुक्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. मागील तीन दिवसात दररोज इंदापूर तालुक्यात 50 हून अधिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, तालुक्यातील मागील तीन दिवसात 150 कोरोना बाधित झाले असून शहरात ही संख्या वाढत आहे.
इंदापूरमध्ये मृत्यूदरात वाढ
एकीकडे पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात शासनाने निर्बंध कमी केले आहेत. मात्र, असे असले तरी इंदापूर तालुक्यात कोरोना बाधित हे वाढतच असल्याचे चित्र आहे. त्यात मृत्यूदर ही काही प्रमाणात वाढला आहे. 1 जुलै रोजी 2.36 असलेला मृत्यूदर आज 2.43 वर जाऊन पोचला आहे, त्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामीण निर्बंध शिथील, व्यापाऱ्यांकडून स्वागत
ग्रामीण भागातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण असून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्हीट रेट पाच टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामुळे सरकारी निकषांनुसार या परिसरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, मद्यालये, व्यापारी संकुले रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले. यानंतर परवानगी देण्याचा आदेश दिल्याने इंदापूर मधील व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण असून या निर्णयाचे स्वागत व्यापाऱ्यांनी केले आहे, मात्र असे असले तरी इंदापूर शहरात सायंकाळी मात्र रस्त्यावर शुकशुकाटच दिसून येत होता.
कोरोनाची तिसरी लाट असल्यानं मंदिर उघडण्याची घाई नको: राजेश टोपे
कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतांना मंदिरं सुरू करण्याची घाई नको. आपण वेट आणि वॉच करत आहोत याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील सात जिल्ह्यामध्ये कोरोना संख्या जरी वाढली असली तरी काळजी वाढवी अशी परिस्थिती नाही. मात्र आमचं लक्ष आहे त्यावर,इकडे लसीकरण वाढवण्याचा विचार आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे जरी संक्रमण होत असले तरी त्याची लक्षणं सौम्य आहेत, मात्र, डेल्टा प्लस वेरिएंटमध्ये संक्रमण अधिक करण्याची क्षमता आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
इतर बातम्या
राज्यात येत्या 5 ते 6 दिवसात शाळा कॉलेज संदर्भात निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
‘मी कायद्याचं पालन करतो, जेव्हा हवं तेव्हा ईडीला सामोरं जाईन’, अनिल देशमुखांची भूमिका
Pune Corona Update Corona cases in Indapur increased during last three days