Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: पुण्यातील सरसकट सर्व दुकानं उघडण्यास परवानगी मिळणार?

मोजक्याच दुकानांऐवजी सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाने बैठकीत केली. | Pune Coronavirus Shops

मोठी बातमी: पुण्यातील सरसकट सर्व दुकानं उघडण्यास परवानगी मिळणार?
पुण्यातील दुकाने बंद
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 2:16 PM

पुणे: तब्बल दोन महिन्यांपासून बंद असलेली पुण्यातील दुकाने आता मंगळवारपासून उघडण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाकडून सरसकट दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासंदर्भात व्यापारी महासंघ आणि आयुक्तांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पुण्यात सरसकट सर्व दुकाने (Shops) उघडण्याची परवानगी मिळू शकते. तसे घडल्यास हा व्यापाऱ्यांसाठी मोठा दिलासा असेल. (All shops in Pune may open from 1st june 2021)

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी यासंदर्भात माहिती दिली. आज संध्याकाळपर्यंत प्रशासनाकडून यासंदर्भातील नियमावली जाहीर होऊ शकते. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने मोजक्याच दुकानांऐवजी सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाने बैठकीत केली. पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार या मागणीविषयी सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Coronavirus: आनंदाची बातमी! पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता, निर्बंध शिथील होणार

‘कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या परिसरात सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्या’

राज्यातील कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर आता ठाकरे सरकारने काही निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने (Shops) अधिक काळ सुरु ठेवता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

तसेच विरेन शाह यांनी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे काही मागण्या केल्या आहेत. राज्यात ज्याठिकाणी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि 25 टक्के बेडस् रिक्त आहेत, अशा ठिकाणी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विरेन शाह यांनी केली आहे. आता ठाकरे सरकार या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या:

आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या; व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती

Mumbai Lockdown: तोपर्यंत मुंबई अनलॉक करणं घातक; पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

‘मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन फक्त ‘ज्ञान’ देतात, आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणारच’

(All shops in Pune may open from 1st june 2021)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.