आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरण्याचे संकेत, बाधितांच्या संख्येत मोठी घट

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. सध्याच्या घडीला पुण्यात 18,440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. | Pune Coronavirus

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरण्याचे संकेत, बाधितांच्या संख्येत मोठी घट
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 8:49 AM

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या पुणे जिल्ह्यातील परिस्थिती आता बदलताना दिसत आहे. याठिकाणी कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरण्याचे संकेत मिळू लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट झाली आहे. (Coronavirus second wave decreases in Pune city)

गेल्या दोन आठवड्यांत पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट दुपटीने कमी झाला आहे. 3 मे रोजी पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट 21 टक्के होता, 17 मे रोजीच्या आकडेवारीनुसार तो 9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही (रिकव्हरी रेट) 90 टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे. सध्याच्या घडीला पुण्यात 18,440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं, AIIMS आणि ICMR कडून नवीन मार्गदर्शक सूचना

पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये 846 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2067 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत शहरातील 3,693 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरात कोरोनाचे 16,561 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 11,482 रुग्ण होम क्वारंटाईन असून 5097 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड

पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील आदेश दिले होते. ससून रुग्णालयातील या वॉर्डमध्ये 50 ऑक्सिजन बेड, 10 आयसीयू बेड आणि स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग तयार करण्यात आला आहे.

मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

मुंबईत म्युकरमायकोसिस आजाराने पहिला बळी घेतला आहे. केईएम रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या 36 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. सध्याच्या घडीला मुंबईत म्युकरमायकोसिसचे 150 रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या:

Pranit Kulkarni Passed Away | एकापेक्षा एक गाणी लिहून माझा प्रणितदादा गेला, कायमचा…. अभिनेते प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट

महाराष्ट्राला मोठा दिलासा! राज्यात आज 26,616 नवे रुग्ण सापडले, मृतांची संख्याही घटली

जन्म एकत्र, मृत्यू एकत्र; 24 व्या वाढदिवशी कोरोना संसर्ग, जुळ्या भावांचा पाठोपाठ मृत्यू

(Coronavirus second wave decreases in Pune city)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.