Pune crime : Holiच्या पार्टीतून लांबवले तब्बल 21 Mobiles! Hadapsar पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हडपसरमधील (Hadapsar) अमानोरा टाऊनशिपमधील मॉलमध्ये होळीनिमित्त (Holi) पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सहभागी तरूण-तरुणींकडील तब्बल 21 मोबाइल (Mobiles) चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : हडपसरमधील (Hadapsar) अमानोरा टाऊनशिपमधील मॉलमध्ये होळीनिमित्त (Holi) पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सहभागी तरूण-तरुणींकडील तब्बल 21 मोबाइल (Mobiles) चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल ही घटना घडली असून याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाइल चोरीला गेल्याची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. होळीनिमित्त अमानोरा मॉलमध्ये सनबर्न होली पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी उच्च क्षमतेचे लाउड स्पीकर वापरले होते. दरम्यान, या गोंधळातच नृत्य करणाऱ्यांचे मोबाइल चोरट्यांनी लंपास केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या आवाजाचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. (21 mobiles stolen from Holi party in hadapsar)
आकडा वाढण्याची शक्यता
होळीच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आलेले पाहायला मिळाले. हडपसर परिसरात अमानोरा टाऊनशिपमध्येही अशाचप्रकारे एका पार्टीचे आयोजन केले होते. मात्र आयोजकांच्या निष्काळजीपणाचा फटका आता काहीजणांना बसला आहे. तब्बल 21 मोबाइल चोरीला गेले असून तो आकडा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.