Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील कोयता हल्ल्यातून तरूणीला वाचावणारा लेशपाल जवळगे म्हणतो, माझं कौतुक करू नका प्लीज…

Leshpal Jawalge on Young Girl Attack : हल्ल्यानंतर मी रूमवर गेलो अन् दीड तास रडलो; लेशपाल जवळगेने हात जोडत म्हणाला, कृपया आता मला सत्काराला नका बोलवू...

पुण्यातील कोयता हल्ल्यातून तरूणीला वाचावणारा लेशपाल जवळगे म्हणतो, माझं कौतुक करू नका प्लीज...
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 11:06 AM

पुणे : सध्या मन सुन्न करणाऱ्या घटना घटत आहेत. कुठे दंगली तर, कुठे जीवघेणे हल्ले होत आहेत. अशात आपल्या सामाजिक जाणिवा बोथट होत चालल्या आहेत का? असा प्रश्न मनाला सतावत राहातो. पण काही घटना घडतात आणि माणुसकी जिवंत असल्याच्या आशा पल्लवीत करतात. एमपीएससी परिक्षेत राज्यात सहावी आलेल्या दर्शना पवारची निर्घृण हत्या झाली. ही घटना ताजी असतानाच आणखी एका एमपीएससी करणाऱ्या तरूणीवरील हल्ल्याने पुणे शहर पुन्हा हादरलंय. पण या घटनेत तिथं असणाऱ्या दोन तरूणांनी या मुलीला वाचवलं. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांच्या सतर्कतेमुळे ही तरूणी थोडक्यात वाचली.

लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. त्यांना सत्कारासाठी बोलावलं जातंय. पण हे असं कौतुक करू नका, असं लेशपाल जवळगे म्हणतोय.

लेशपाल जवळगेने फेसबुक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “सगळीकडून कौतुक होतंय खरं, पण हे माझं कर्तव्य होतं . उलट तुम्ही माझं कौतुक करून उपकाराची भावना दाखवताय… मी त्या ताईवर उपकार केले नाहीत. तर मी माझं कर्तव्य पार पाडलं. तरीही सर्वांचे खुप खूप आभार…”, असं लेशपाल आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाला आहे.

या घटनेसंदर्भात टीव्ही 9 मराठीने लेशपाल जवळगे याच्याशी संवाद साधला. यावेळी मी PSI होण्याचं स्वप्न बघतोय. त्यामुळे त्या मुलीचा जीव वाचवणं हे माझं कर्तव्य होतं आणि तेच मी केलं, असं लेशपालने म्हटलं.

या घटनेनंतर खूप फोन येत आहेत. सगळे सत्काराला बोलवत आहेत. पण ती घटना घडली तेव्हा त्या मुलाला पोलीस स्टेशनला दिल्यानंतर मी रूमला गेलो अन् एक ते दीड तास रडलो. थोडा उशीर झाला असता तर ती मुलगी कशी मृत्यूमुखी पडली याची कहानी मला लोकांना सांगावं लागलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. त्यामुळे हात जोडतो, पण मला आता सत्काराला बोलावू नका, असं लेशपाल याने म्हटलंय.

दिल्लीतील घटना मी ऐकली आहे. दर्शना पवार हिच्या सोबत घडलेल्या घटनेमुळे मन हेलावलं होतं. दिल्लीतील घटनेचा व्हीडिओ पाहिला. तेव्हा तिथं आजूबाजूचे लोक उघड्या डोळ्यांनी सगळं फक्त बघत होते. तेव्हा तो व्हीडिओ बघताना मी त्या लोकांना शिव्या दिल्या होत्या. तो तरूण एका मुलीला मारत असताना लोक शांतपणे फक्त बघ्याची भूमिका कसे घेऊ शकतात? माझी प्रचंड चिडचिड झाली.

पण आता माझ्या समोर ही घटना घडत होती. त्या क्षणाला मला काय झालं मलाही माहिती नाही. पण मी पुढे गेलो आणि त्या मुलीचा जीव वाचवला. जर तीन ते चार सेकंद जरी उशीर झाला असता तरी तीच्या जीवाला धोका होता, असं लेशपाल म्हणाला.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.