Pune crime | म्हाडा पेपर फुटीप्रकरणी आणखी एका दलालाच्या पुणे सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; तपासाला वेग

पुणे पोलिसांनी आतापर्यंत म्हाडा पेपर फुटीतीलप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉ. प्रीतिश देशमुख, संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या आणखी दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे चौकशी सुरूच आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काही आरोपी व पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने तपास थंडावला होता, मात्र आता पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून , वेगाने तपास करण्यास सुरुवात झाली आहे.

Pune crime | म्हाडा पेपर फुटीप्रकरणी आणखी एका दलालाच्या पुणे सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; तपासाला वेग
pune-police
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 10:51 AM

पुणे – आरोग्यभरती, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यामधील सहभागांची धरपकड सुरु असतानाच दुसरीकडं म्हाडा पेपर(Mhada exam scam) फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी (Pune cyber  police ) आणखी एकाला ताब्यात घेतलं आहे. शरद भुसारी (Shard  bhusari )असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत म्हाडा पेपर फुटीतीलप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉ. प्रीतिश देशमुख, संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या आणखी दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे चौकशी सुरूच आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काही आरोपी व पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने तपास थंडावला होता, मात्र आता पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून , वेगाने तपास करण्यास सुरुवात झाली आहे. म्हाडा ,आरोग्य भरती , टीईटी या सर्व घोटाळ्यांमधील आरोपीचे एकमेकांशी लागे बांधे असल्याने वेळोवेळी नवनवीन माहिती पोलिसांच्या समोर येत आहे. त्यामुळे घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

टीईटी घोटाळ्यातील आरोपीचीही धरपकड

पुणे सायबर पोलिसांनी टीईटी घोट्याळ्यातील आणखी तीन दलालांना नुकतीच नुकतीच अटक केली आहे. संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोट्यवधीची माया गोळा करून वाटून घेतल्याचे तपासात उघड झालं आहे. नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक करण्यात आली आहे. मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. नाशिक), कलीम गुलफेर खान (वय 52, रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय 40, रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखी आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येणार असल्याची महिती पोलिसांनी दिली आह पोलिसांनी सांगितले.

पोलीस भरतीतही घोटाळा

म्हाडा नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रीतिश देशमुखच्या चौकशीत पोलिसांनी टीईटी परीक्षेतला गैरप्रकार उघडकीस आला. आता प्रीतिश देशमुखच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली होती. ते म्हणजे प्रीतिश देशमुखच्या घरात पोलीस भरतीची ओळखपत्रं सापडली होती. यामुळे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीची परीक्षा ही संशयाच्या भोवऱ्यात आली.

डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून साडेतीन कोटींसाठी; नाशिक पोलिसांच्या तपासात नेमके काय आले समोर?

Manoj Kotak यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

Wriddhiman Saha च्या ट्विट, इंटरव्ह्यूप्रकरणी BCCI ॲक्शन मोडवर, दोषींवर कारवाई करणार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.