रमेश थोरातांनी मागितली शरद पवारांची जाहीर माफी; दौंडमधून उमेदवारी मिळणार?

Ramesh Thorat on Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पुणे जिल्ह्यात यंदा वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नाही. अशातच रमेश थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. वाचा...

रमेश थोरातांनी मागितली शरद पवारांची जाहीर माफी; दौंडमधून उमेदवारी मिळणार?
रमेश थोरात, शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 12:19 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीचा ‘धुरळा’ उडालाय. अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अशात दौंड तालुक्यात मात्र ‘वेट ॲण्ड वॉच’चं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपकडून विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. जागावाटपात दौंडची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. शरद पवार गटाच्या दोन उमेदवार याद्या जाहीर झाल्या आहेत. मात्र अद्यापर्यंत दौंडच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच इच्छुक उमेदवार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

रमेश थोरातांनी मागितली माफी

दौंड तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले रमेश थोरात यांनी आज दौंडमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रमेश थोरात यांनी शरद पवार यांची जाहीर माफी मागितली. राज्यात एक वर्षात अनेक घडामोडी झाल्या. भारतीय जनता पार्टीचा अनुभव खूप वाईट आला. शरद पवार आमचे दैवत आहेत. शरद पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. माझी उमेदवारी शरद पवार उद्या पर्यंत जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. भारतीय जनता पार्टीसोबत मी राहू शकत नाही, असं रमेश थोरात म्हणाले.

दौंडमधील उमेदवारीला विलंब का होतोय?

दौंडमध्ये भाजप विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपने राहुल कुल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र शरद पवार गटाच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात आहे. अजित पवार भाजपसोबत गेले. तेव्हा रमेश थोरात हे त्यांच्यासोबत महायुतीत गेले. मात्र महायुतीत दौंडची जागा भाजपकडे आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर रमेश थोरातांना शरद पवार गटात प्रवेश करायचा आहे. निवडणूक लढवायची आहे.

थोरात अजित पवारांसोबत गेले तेव्हा अप्पासाहेब पवार यांनी शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहणं पसंत केलं. ते देखील दौंडमधून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात जो सोबत राहिला त्याला उमेदवारी द्यायची की तालुक्यात प्रभाव असणाऱ्या रमेश थोरातांना तिकीट द्यायचं? असा पेच शरद पवारांना समोर आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार दौंडमधून कुणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.