Daund Election Result 2024 LIVE Updates: रमेशअप्पा की राहुलदादा?; दौंड विधानसभा मतदारसंघाचा निकाल काय?
Daund MLA Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पहिले कर हाती येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या निकालाकडे जिल्ह्याचं लक्ष आहे. दौंडमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दौंडमध्ये भाजपचे उमेदवार राहुल कुल आघाडीवर आहेत. 7 हजार 729 मतांनी राहुल कुल आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश थोरात पिछाडीवर आहेत. दौंड तालुक्यात यंदा अटीतटी लढत झाली. राहुल कुल यांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी रमेश थोरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यंदाची ही लढत अत्यंत अटीतटीची झाली. राहुल कुल एकूण 8117 मतांनी पाचव्या फेरी अखेर आघाडीवर आहेत.
दौंडमध्ये चुरशीची लढत
दौंड विधानसभा मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची लढत झाली आहे. विद्यमान आमदार राहुल कुल विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश थोरात यांच्यात लढत झाली. या मदारसंघात कुल कुटुंबियांचा जनाधार मोठा आहे. राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल हे याआधी या मतदारसंघात आमदार होते. त्यानंतर राहुल कुल यांच्या आई रंजना कुल या देखील आमदार राहिल्या आहेत. आता पुन्हा एकदा राहुल कुल दौंड विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सलग दुसऱ्यांदा ते भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत.
13 हजार 889 मतांनी राहुल कुल विजयी झालेले आहेत. राहुल कुल यांना 1 लाख 20 हजार 721 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रमेश थोरात यांना 1 लाख 06 हजार 832 मतं मिळालेली आहेत.
दौंडला मंत्रिपद मिळणार?
दौंड विधानसभा मतदारसंघात यंदा मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 18 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांची दौंडच्या वरवंडमध्ये सभा झाली होती. या सभेत फडणवीस यांनी दौंडकरांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता. तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो. यावेळी राहुल कुल यांना मंत्री करणार आहे. पण माझी अट आहे. 20 हजार पेक्षा कमी मताधिक्याने निवडून दिलं तर राज्यमंत्रिपद देणार. 20 हजार पेक्षा जास्त मताधिक्य दिले तर कॅबिनेट मंत्री देणार आहे, असं फडणवीस म्हणाले होते. आज राहुल कुल यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे दौंडला आता मंत्रिपद मिळणार का? याची दौंडमध्ये चर्चा होत आहे.