पुणे : जिल्ह्यातील चार तालुक्यामधील सरपंच, उपसरपंच निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी 7 गावांची याचिका फेटाळून लावल्याने सरपंच, उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Pune District 4 Taluka Sarpanch And Deputy Sarpanch Election Programme)
खेड,शिरूर,मावळ,बारामती तालुक्यातील काही गावाने सरपंच पदाच्या आरक्षण सोडती बाबत संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पुणे जिल्हाधिकारी यांना संबंधित ग्रामपंचायतीचे म्हणणे ऐकुन निकाल देण्यास सांगितला होता. त्यानुसार संबंधित याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेऊन सर्व याचिका फेटाळून लावल्या.
यामुळे खेड, शिरुर, मावळ आणि बारामती या चार ही तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या चार ही तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील एकूण 746 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतरची पहिल्या सभेमध्ये करायच्या सरपंच आणि उपसरपंच निवडीचे अधिकार दिले होते. परंतु खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, बिरदवाडी, नाणेकरवाडी, मावळ तालुक्यातील परंदवाडी, शिरुर तालुक्यातील शिक्रापूर आमि बारामती तालुक्यातील निंबुत या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत याचिका दाखल केल्याने या तालुक्यातील निवडणुका न घेता 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले होते.
(Pune District 4 Taluka Sarpanch And Deputy Sarpanch Election Programme)
हे ही वाचा :
परभणी जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर, राजकीय पक्ष तयारीला लागले